शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वेरुळ ते छ. संभाजीनगर प्रवासात परदेशी पाहुण्यांचे हाल; बसमध्ये जागा नाही, तासभर उभ्यानेच प्रवास

By संतोष हिरेमठ | Updated: February 24, 2026 19:06 IST

जागतिक वारसा स्थळांच्या राजधानीत पर्यटन बसच गायब! साऊथ कोरियन पर्यटकाला स्मार्ट सिटी बसमध्ये बसण्यासाठी मिळेना जागा

छत्रपती संभाजीनगर : दुपारची वेळ… वेरुळहून छत्रपती संभाजीनगरकडे येणाऱ्या स्मार्ट सिटीच्या बसमध्ये परदेशी पर्यटक चढतात; पण काही मिनिटांतच सर्व सीट भरतात आणि परदेशी पाहुण्यांना उभ्यानेच प्रवास करावा लागतो. काही मिनिटे नाही, तासभर उभ्यानेच प्रवास. पर्यटनाच्या आनंदासाठी हा त्रास पर्यटक सहनही करतात. ही काही एका दिवसाची स्थिती नाही. जागतिक वारसा स्थळांचे प्रवेशद्वार असलेल्या शहरातील पर्यटन व्यवस्थेचे हे वास्तव रोज समोर येत आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये दररोज देश-विदेशातून पर्यटक दाखल होतात. अजिंठा आणि वेरुळ लेणी पाहण्यासाठी ते शहरात मुक्काम करतात. सर्वच परदेशी पर्यटक खासगी चारचाकीतून प्रवास करतात, असे नाही. अनेक परदेशी पाहुणे सार्वजनिक बससेवेचा शोध घेतात. शहरात आजघडीला वेरुळ, अजिंठ्यास जाण्यासाठी पर्यटन बस नाही. पर्यटनासाठी स्वतंत्र बससेवा नसल्याने त्यांना नियमित एसटी बसवरच अवलंबून राहावे लागते. त्याबरोबरच शहरातून ६ स्मार्ट सिटी बस या वेरुळपर्यंत धावतात. परंतु या बसमधून प्रवास करतानाही परदेशी पाहुण्यांना बहुतांशवेळी उभ्याने प्रवास करावा लागत आहे. कारण शहरात नियमित ये-जा करणाऱ्यांच्या संख्येमुळे परदेशी पाहुण्यांना जागा मिळणे अवघड होते. पर्यटन तज्ज्ञांच्या मते, स्वतंत्र ‘टुरिस्ट बस’ सुरू झाल्यास पर्यटकांचा अनुभव सुधारू शकतो.

एक तास उभे राहूनच प्रवाससाऊथ कोरियाहून आलेल्या पर्यटकाने स्मार्ट सिटी बसमधून वेरुळ ते छत्रपती संभाजीनगर असा प्रवास केला. बसमध्ये बसायला जागा मिळाली नाही. त्यामुळे या परदेशी पाहुण्याला तासभर उभे राहूनच प्रवास करावा लागला.

नियमित बससेवावेरुळ, अजिंठा मार्गावर नियमित बससेवा सुरू आहे. ई-बसही सुरू आहे. त्यातून पर्यटक प्रवास करू शकतात.- संतोष घाणे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी महामंडळ

वेगळी व्यवस्था नाहीवेरुळला स्मार्ट सिटी बस जाते. परंतु स्मार्ट सिटी बसमध्ये पर्यटकांसाठी वेगळी आरक्षण व्यवस्था नाही. काही ठराविक आरक्षण आहेत. महापालिकेकडून पर्यटन बस सुरू करण्यात येणार आहे.- संजय सुपेकर, चीफ ऑपरेशनल मॅनेजर, स्मार्ट सिटी बस

वर्षभरातील पर्यटक संख्या (२०२४-२५) :अजिंठा लेणी : भारतीय पर्यटक - ४,४०,३५६; परदेशी पर्यटक - १३,३७२वेरूळ लेणी : भारतीय पर्यटक - १५,६३,८३७; परदेशी पर्यटक - १७,४६५जिल्ह्यातील टुरिस्ट कॅबची संख्या : ४,९४४

English
हिंदी सारांश
Web Title : Foreign Tourists Face Difficulties on Aurangabad-Ellora Bus Route.

Web Summary : Tourists visiting Ellora face hardship due to crowded buses. They often travel standing for an hour. Dedicated tourist bus services are needed. Authorities cite regular bus services, but admit no special tourist arrangements exist. High tourist numbers exacerbate the problem.
टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळtourismपर्यटनchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर