प्रमुख पक्षासह एकूण १४७ उमेदवारांचे अर्ज
By Admin | Updated: December 17, 2015 23:49 IST2015-12-17T23:46:44+5:302015-12-17T23:49:09+5:30
औंढा नागनाथ : नगर पंचायत निवडणुकीची उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रमुख पक्षांसह १०२ उमेदवारांनी अर्ज दाखल केल.

प्रमुख पक्षासह एकूण १४७ उमेदवारांचे अर्ज
औंढा नागनाथ : नगर पंचायत निवडणुकीची उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रमुख पक्षांसह १०२ उमेदवारांनी अर्ज दाखल केल. एकूण १४७ अर्ज झाले आहेत. उद्या तहसीलमध्ये सकाळी ११ वाजेपासून अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.
सकाळी ११ वाजतापासूनच अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी तहसील प्रांगणामध्ये गर्दी केली होती. गर्दीचा अंदाज घेवून प्रशासनाने सभागृहातच उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था केली होती. उमेदवारांना पिण्याचे पाणी सोडले तर बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था केली होती. प्रमुख पक्षांनी वेळ न घालवता शक्तीप्रदर्शन न करताच उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये काँग्रेसच्या वतीने प्रभाग १ सोडून १६ प्रभागात, भाजपाने प्रभाग ०३ सोडून १६ प्रभागात, शिवसेना प्रभाग ०३, ०५, ०९ सोडून १४ प्रभागात तर राष्ट्रवादीने प्रभाग ०१, ०५, १०, ११, १४, १६ सोडून ११ प्रभागातून उमेदवारांना पक्षाच्या वतीने एबी फॉर्म देवून उमेवारी निश्चित केले. तसेच एमआएम ७, बीएसपी ५, लोकजनशक्ती आरपीय (ए) आपक्ष उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उपविभागीय अधिकारी अनुराधा ढालकरी, तहसीलदार श्याम मदनूरकर यांनी उमेदवारांनी ३ च्या आत सभागृहात घेऊन अर्जांची तपासणी करुनच ते स्वीकारले. आ. डॉ. संतोष टारफे, माजी आ. गजानन घुगे, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, भाजपचे सुरजितसिंह ठाकूर व राकॉंचे तालुकाअध्यक्ष संजय दराडे, बाबूराव ढोले यांनी पक्षीय उमेदवारांचे एबी फॉर्म निर्वाचित अधिकारी अनुराधा ढालकरी यांच्याकडे सुपूर्दकेले. त्यामुळे ज्यांना उमेदवारी मिळाली, त्यांनाही आपल्या उमेदवारीबाबत शेवटपर्यंत काहीच कळाले नाही. त्यामुळे सायंकाळी ६ वाजेपर्यंत परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. (वार्ताहर)