ंलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; एकास सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2016 01:14 IST2016-10-01T01:00:16+5:302016-10-01T01:14:43+5:30
उमरगा : लग्नाचे आमिष दाखवून एका मुलीवर जबरी अत्याचार करणाऱ्यास आरोपीस उमरगा येथील विशेष न्यायाधीशांनी सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़

ंलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; एकास सक्तमजुरी
उमरगा : लग्नाचे आमिष दाखवून एका मुलीवर जबरी अत्याचार करणाऱ्यास आरोपीस उमरगा येथील विशेष न्यायाधीशांनी सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ तसेच ५०० रूपयांचा दंडही ठोठावला. ही घटना उमरगा तालुक्यातील दक्षिण माडज येथे घडली होती़
याबाबत अतिरिक्त शासकीय अभियोक्ता एसक़े़घोडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथील एक मुलगी उमरगा तालुक्यातील दक्षिण माडज येथे राहत होती़ दक्षिण माडज येथे असताना ती गावातीलच सुधीर विजयानंद सूर्यवंशी (वय-३०) याच्या शेतात कामासाठी जात होती़ त्यावेळी सुधीर सूर्यवंशी याने त्या मुलीशी ओळख करून घेत तिला त्याच्या घरी बोलावून घेतले़ घरी कोणी नसताना तिच्या इच्छेविरूध्द जबरी अत्याचार केले़ तसेच लग्न करण्याचे आश्वासन देत घडला प्रकार कोणाला सांगितला तर जीवे मारून टाकण्याची धमकी दिली़ त्यानंतर सुधीर सूर्यवंशी हा दापोडी येथे राहण्यास गेला़ मुलीला आठवा महिना सुरू झाल्यानंतर तिला कोर्टात लग्न करतो, असे आश्वासन दिले़ त्यानंतर मात्र, त्याने मुलीबरोबर लग्न करणार नाही असे सांगितल्याची फिर्याद पीडित मुलीने ९ जून २०१५ रोजी पुणे येथील भोसरी ठाण्यात दिली होती़ त्यानुसार गुरनं ००/१५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता़ त्यानंतर हे प्रकरण उमरगा ठाण्यात वर्ग होवून गुरनं ११८/१५ प्रमाणे कलम ३७६ (१), ३४१, ५०६ भादंविसह कलम ३,४ लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ गुन्हा दाखल करण्यात आला होता़
या प्रकरणाच्या तपासानंतर उमरगा येथील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते़ या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान समोर आलेले पुरावे, साक्ष व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता एसक़े़घोडके यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी सुधीर विजयानंद सूर्यवंशी याला कलम ३७६ भादंवि तसेच लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम कायदा २०१२ कलम ४ प्रमाणे दोषी ठरवून सात वर्षे सक्तमजुरी व ५०० रूपयांचा दंड ठोठावला़ दंड न दिल्यास पंधरा दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली़ (वार्ताहर)
या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू असताना साक्षीदार फितूर झाले होते़ मात्र, वैद्यकीय अधिकारी आणि तपासिक अंमलदार मनोजकुमार लोंढे यांनी दिलेली साक्ष या प्रकरणात महत्त्वाची ठरली़
४हे प्रकरण न्यायालयात सुरू असताना तत्कालीन अतिरिक्त शासकीय अभियोक्ता एस़ए़पोतदार यांनी चार व विद्यमान अतिरिक्त शासकीय अभियोक्ता एसक़े़घोडके यांनी तीन साक्षीदार असे एकूण सात साक्षीदार तपासले होते़ त्यातील पीडित मुलगी, पीडित मुलीची आई तसेच पंच साक्षीदार हे सरकार पक्षास फितूर झाले़