लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
By Admin | Updated: March 19, 2016 00:50 IST2016-03-19T00:39:29+5:302016-03-19T00:50:34+5:30
मुरुम : आई-वडीलांकडे राहणाऱ्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी मुरूम पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध बलात्कार व अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
मुरुम : आई-वडीलांकडे राहणाऱ्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी मुरूम पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध बलात्कार व अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भुसणी येथील एक विवाहिता आई-वडीलांच्या घरी राहत होती. गावातील व सध्या सैन्यदलात कार्यरत असलेल्या संदीप गुंडाप्पा तारुनगे याने सदर महिलेस लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षापासून शारीरिक संबंध ठेवले. त्यावर संबंधित महिलेने लग्न केव्हा करणार? अशी विचारणा केल्यानंतर वेळोवेळी थापा मारल्या, अशा आशयाची फिर्याद संबंधित महिलेने मुरुम पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून संदीप तारूनगे याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला असून, तपास उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत खांडवी, पोेहेकॉ सदाशिव काळेवाड, हरिदास महाबोले हे करीत आहेत. (वार्ताहर)