लिव्हरच्या रुग्णांना औषधी विक्रेत्यांकडून यातना
By Admin | Updated: September 18, 2014 00:42 IST2014-09-18T00:35:29+5:302014-09-18T00:42:02+5:30
औरंगाबाद : लिव्हरच्या रुग्णांसाठी लागणाऱ्या एल्बुमीन कन्टेन असलेल्या औषधीला केंद्र शासनाने रेट कंट्रोलमध्ये समाविष्ट करताना औषधींचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला

लिव्हरच्या रुग्णांना औषधी विक्रेत्यांकडून यातना
औरंगाबाद : लिव्हरच्या रुग्णांसाठी लागणाऱ्या एल्बुमीन कन्टेन असलेल्या औषधीला केंद्र शासनाने रेट कंट्रोलमध्ये समाविष्ट करताना औषधींचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. ज्या व्यापाऱ्यांकडे ही औषधी उपलब्ध आहे, त्यांनी चक्क काळ्याबाजारात विक्री सुरू केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
लिव्हर, पोटाच्या आजाराच्या विविध शस्त्रक्रिया, आयसीयूमध्ये असलेल्या अनेक रुग्णांना एल्बुमीन या कन्टेनच्या औषधींची गरज असते. शंभर एमएलमध्ये ही औषधी कालपरवापर्यंत उपलब्ध होती.
अलीकडेच केंद्र शासनाने प्राईज कंट्रोल अॅथॉरिटीने औषधीला रेट कंट्रोलमध्ये आणले. त्यामुळे बाजारातून औषधींचा साठाच गायब झाला आहे. शहरातील अनेक लहान मोठ्या रुग्णालयांमध्ये औषधोपचार घेणाऱ्या रुग्ण आणि नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
अन्न व औषध प्रशासनाने यासंदर्भात लवकरात लवकर ठोस पावले न उचलल्यास परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, असे काही औषध विक्रेते आणि डॉक्टरांचे म्हणणे आहे. बाजारात एल्बुमीनशिवाय इतर दुसरे कोणतेही औषध उपलब्ध नाही. पूर्वी हे औषध आठ हजार रुपयांना मिळत होते.
केंद्राच्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर त्याची किंमत ३ हजार ८०० रुपये करण्यात आली. औरंगाबादेतील औषध विक्रेते मुबारक चाऊस यांनी सांगितले की, दररोज किमान आठ ते दहा नागरिक या औषधीसंदर्भात विचारणा करीत आहेत.
आमच्याकडे आणि मोठ्या स्टॉकिस्टकडे औषध उपलब्ध नाही. रुग्णांचे नातेवाईक पर्यायी औषधी द्या, अशी मागणी करतात. त्यालाही आमचा नाईलाज आहे.