मुलीवर अत्याचार; दहा वर्षाची सक्तमजुरी

By Admin | Updated: March 24, 2017 00:39 IST2017-03-24T00:34:57+5:302017-03-24T00:39:35+5:30

ढोकी : एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून जबरी अत्याचार करणाऱ्यास येथील पहिले जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली़

Torture on girls; Ten years of forced labor | मुलीवर अत्याचार; दहा वर्षाची सक्तमजुरी

मुलीवर अत्याचार; दहा वर्षाची सक्तमजुरी

ढोकी : एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून जबरी अत्याचार करणाऱ्यास येथील पहिले जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली़ ही घटना २१ आॅगस्ट २०१५ रोजी तालुक्यातील ढोकी येथे घडली होती़
याबाबत शासकीय अभियोक्ता अ‍ॅड़ आशिष कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढोकी येथील एक अल्पवयीन मुलीस गावातीलच महेश पुंडलिक धावारे याने २१ आॅगस्ट २०१५ रोजी घरी बोलावून घेतले़ त्यावेळी तिला आपण पुण्याला जावून लग्न करू, असे अमिष दाखविले़ रात्रीच्यावेळी पीडित मुलीसह तिचे आई-वडिल धावारे याच्या घरी आले होते़ काही वेळानंतर पीडित मुलगी आईला जेवण करण्यास जाते, असे सांगून घरी गेली होती़ त्यावेळी महेश धावारे हा तिच्या मागेमागे तिच्या घरी गेला़
मुलीला लग्नाचे अमिष दाखवून पुणे येथील नातेवाईकाच्या घरी नेले़ नातेवाईक घराबाहेर गेल्यानंतर धावारे याने पीडितेवर जबरी अत्याचार केला़ या प्रकरणी पीडित मुलीने २५ आॅगस्ट रोजी दिलेल्या फिर्यादीवरून महेश धावारे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या प्रकरणाच्या तपासानंतर ढोकी पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ या प्रकरणाची सुनावणी पहिले जिल्हा सत्र न्यायाधीश एस़आय़पठाण यांच्या समोर झाली़ या प्रकरणात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले़ या प्रकरणी समोर आलेले पुरावे आणि अतिरिक्त जिल्हा सरकारी वकिल अ‍ॅड़ आशिष कुलकर्णी यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी महेश धावारे याला दहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंड़ तसेच दंड न भरल्यास आणखी एक महिन्याचा कारावास, अशी शिक्षा सुनावली़

Web Title: Torture on girls; Ten years of forced labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.