हिंगोलीत मुलीवर अत्याचार
By Admin | Updated: June 22, 2014 00:25 IST2014-06-22T00:05:52+5:302014-06-22T00:25:23+5:30
हिंगोली : शहरातील मस्तानशहा नगर भागात चॉकलेटचे आमिष दाखवून सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना २० जून रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली.

हिंगोलीत मुलीवर अत्याचार
हिंगोली : शहरातील मस्तानशहा नगर भागात चॉकलेटचे आमिष दाखवून सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना २० जून रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील मुलीस चॉकलेटचे आमिष दाखवून दुकानामध्ये ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी स.अनवर स. रतन (रा. मस्तानशहा नगर) याच्या विरुद्ध कलम ३७६ (२) (आय) (जे), २९४, ३२३, ५०६ भादंवि आणि प्रोटेक्शन आॅफ चॉईल्ड सेक्स्युअल अफेन्स कलम ४ व ८ नुसार हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पिडीत मुलीच्या वडीलाने पोलिसांत फिर्याद दिली. दरम्यान घटनेनंतर मुलीच्या नातेवाईकांनी स. अनवर याच्या दुकानावर जावून विचारणा केली असता त्याने शिवीगाळ करून त्यांनाच धमकावले. त्यानंतर नागरिकांनी चोप देताच तो पसार झाला. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार, पोनि सतीशकुमार टाक यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार प्रियंका पाटकर करीत आहेत. (प्रतिनिधी)