शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

टोरेससारखा क्विक स्टार्टचा ३५ कोटींचा घोटाळा; संचालक सहा महिन्यांपूर्वीच देश सोडून विदेशात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 11:56 IST

कंपनीचे मुख्य संचालक व आरोपी हर्षल याेगेश गांधी आणि प्रतीक एम. शहा (दोघेही रा. अहमदाबाद) हे सहा महिन्यांपूर्वी देश सोडून अरब देशात पसार झाले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : मुंबईतील टोरेस घोटाळ्याप्रमाणे शहरात दरमहा ३ टक्के परतावा, विदेशवारी व महागड्या बक्षिसांचे आमिष दाखवून गुजरातच्या क्विक स्टार्ट २४ ग्रुप कंपनीने दीड हजार गुंतवणूकदारांकडून ३५ कोटी रुपये उकळले. कंपनीचे मुख्य संचालक व आरोपी हर्षल याेगेश गांधी आणि प्रतीक एम. शहा (दोघेही रा. अहमदाबाद) हे सहा महिन्यांपूर्वी देश सोडून अरब देशात पसार झाले आहेत.

शनिवारी जीवन प्राधिकरणाचे सेवानिवृत्त उपअभियंता सरताजसिंग चहल यांनी तक्रार दिल्यानंतर जवळपास दीड हजार गुंतवणूकदारांची ३५ कोटींची फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने व्यवस्थापक शीतल सुधाकर मोतिंगे, विठ्ठल भागाजी तांदळे यांना अटक केली. चौघांनी मिळून मराठवाड्यासह राज्यातील अनेक शहरांत सामान्यांकडून पैसे उकळले. देशातील २४ कंपन्यांत पैसे गुंतवून परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. शहा, गांधीच्या शोधासाठी सहायक निरीक्षक मोहसीन सय्यद यांच्यासह पाच कर्मचाऱ्यांचे पथक सोमवारीच अहमदाबादमध्ये दाखल झाले. मात्र, त्यांना आरोपी मिळून आले नाहीत.

सहा महिन्यांपूर्वी कार्यालय रिकामेपथकाने शहा, गांधीचे अहमदाबादमधील कार्यालय गाठले. मात्र, तेथे आता दुसरेच कार्यालय आहे. दोघांनी सहा महिन्यांपूर्वीच जागा सोडल्याचे स्थानिकांकडून कळाले. शिवाय, घरातील सदस्यही दुसरीकडे स्थायिक झाले. ते राहत असलेले घरदेखील भाडेतत्त्वावरचे होते.

लुक आउट नोटीस जारीदोघांनी देश सोडून पलायन केले. हे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी इमिग्रेशनला त्यांच्याबाबत ई-मेलद्वारे पत्रव्यवहार केला हाेता. त्यानंतर चोवीस तासांत त्यांच्या विरोधात लुक आउट नोटीस जारी झाल्याचे निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी