३०० रुपयांसाठी दात पाडले !

By Admin | Updated: November 2, 2016 01:00 IST2016-11-02T00:57:44+5:302016-11-02T01:00:38+5:30

लातूर : ‘हातउसने घेतलेले ३०० रुपये आत्ताच दे’ या कारणावरून झालेल्या मारहाणीत एकाचे दोन दात पडले आहेत.

Tooth for 300 rupees! | ३०० रुपयांसाठी दात पाडले !

३०० रुपयांसाठी दात पाडले !

लातूर : ‘हातउसने घेतलेले ३०० रुपये आत्ताच दे’ या कारणावरून झालेल्या मारहाणीत एकाचे दोन दात पडले आहेत. तसेच फायटर व लाकडाने मारहाण केल्याने तो जखमी झाल्याची घटनाही सोमवारी राजे शिवाजीनगर भागात घडली.
लातूरच्या बार्शी रोडवरील राजे शिवाजीनगर भागात फिर्यादी सद्दाम अब्दुल रहेमान शेख (वय ३१) यास आरोपी बालाजी कुंभारकर व अन्य तिघांनी संगनमत करून ‘हातउसने दिलेले ३०० रुपये आत्ताच दे’ या कारणावरून शिवीगाळ सुरू केली. तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत फायटर व लाकडाने मारून जखमी केले. या मारहाणीत तोंडावर मार लागल्याने सद्दाम शेख याचे दोन दात पडून निकामी झाले आहेत.
या प्रकरणी सद्दाम अब्दुल शेख यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून बालाजी कुंभारकर सोबत अन्य तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस करीत आहेत.

Web Title: Tooth for 300 rupees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.