शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वेगाने घेतला जीव; बजाजनगरात दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 11:47 IST

या भीषण अपघातात दोन्ही दुचाकी चालकांचा मृत्यू झाला तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला

- मेहमूद शेख

वाळूजमहानगर: भरधाव दोन दुचाकींच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री बजाजनगरात घडली. या अपघातात अन्य एकजण गंभीर जखमी झाला. संजय रामदास बोरुडे (२५, रा.रांजणगाव) असे एका मृताचे नाव असून दुसऱ्या मृताची ओळख पटली नाही. 

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, संजय रामदास बोरुडे (२५,रा.दत्तनगर, रांजणगाव) व त्याचा मित्र कल्याण प्रभाकर मानकापे हे दोघे शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास दुचाकीवर (क्रमांक एम.एच.२०,जी.जे.६०२५) बजाजनगरातून भरधाव वेगाने उद्योग नगरीत चालले होते. दरम्यान, महाराणा प्रताप चौकात विरुद्ध दिशेने एक दुचाकी (क्रमांक एम.एच.२०, ए.एम.९११७) वेगाने येत होती. दोन्ही दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली. यात दोन्ही दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी झाले होते. 

माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते मनोज जैन यांनी नागरिक व पोलिसांच्या मदतीने तिन्ही गंभीर जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान संजय बोरुडे व अन्य दुचाकीवरील अनोळखी तरुणाचा मृत्यू झाला. तर कल्याण मानकापे याच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताची एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबाद