‘आमचं विद्यापीठ’ पुस्तकाचे उद्या विमोचन

By Admin | Updated: February 14, 2015 00:13 IST2015-02-14T00:06:35+5:302015-02-14T00:13:22+5:30

औरंगाबाद : ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या सोबत काम करताना आलेल्या पत्रकारितेतील अनुभवांवर आधारित ‘आमचं विद्यापीठ’ या पुस्तकाचा विमोचन सोहळा रविवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी होत आहे.

Tomorrow's release of 'Our University' book | ‘आमचं विद्यापीठ’ पुस्तकाचे उद्या विमोचन

‘आमचं विद्यापीठ’ पुस्तकाचे उद्या विमोचन

औरंगाबाद : पत्रकार, संपादक अशा भूमिकेत काम करीत असताना आपल्यासोबतच अनेक पत्रकार घडविणाऱ्या आणि त्यांना स्वत:ची अशी ओळख देणाऱ्या ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या सोबत काम करताना आलेल्या पत्रकारितेतील अनुभवांवर आधारित ‘आमचं विद्यापीठ’ या पुस्तकाचा विमोचन सोहळा रविवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी होत आहे.
मुंबई लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक अतुल कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी ज्येष्ठ संपादक कुमार केतकर, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर आणि ज्येष्ठ संपादक मधुकर भावे उपस्थित राहणार आहेत.
राजेंद्र दर्डा यांनी पत्रकारितेची कोणतीही पदवी न घेतलेल्या अनेकांना पत्रकार म्हणून नावारूपाला आणले; शिवाय त्यांना स्वत:ची अशी ओळखही निर्माण करून दिली. त्या सगळ्या प्रवासातील अनुभव, किस्से, घटनांवर ‘आमचं विद्यापीठ’ हे पुस्तक आधारित
आहे.
एमजीएम महाविद्यालयाच्या परिसरातील असणाऱ्या रुक्मिणी सभागृहात सायंकाळी ४.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन रेखा प्रकाशनचे प्रकाशक हेमराज शहा, ज्येष्ठ संपादक दिनकर रायकर आणि चक्रधर दळवी यांनी केले आहे.

Web Title: Tomorrow's release of 'Our University' book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.