काम पूर्ण होण्याच्या अगोदरच टोल वसुली
By Admin | Updated: July 6, 2014 00:14 IST2014-07-06T00:07:53+5:302014-07-06T00:14:18+5:30
मुखेड : नरसी- मुखेड- ताजबंद शिरुर या राज्य रस्ता २२५ च्या नूतनीकरण व रुंदीकरणाचे काम सुरु होणार आहे. त्यापूर्वीच संबंधित एजन्सीने टोल वसुली सुरु केली.

काम पूर्ण होण्याच्या अगोदरच टोल वसुली
मुखेड : नरसी- मुखेड- ताजबंद शिरुर या राज्य रस्ता २२५ च्या नूतनीकरण व रुंदीकरणाचे काम सुरु होणार आहे. त्यापूर्वीच संबंधित एजन्सीने टोल वसुली सुरु केली. त्याच्या निषेधार्थ शिवसेनेने चक्का जाम आंदोलन केले.
सलगरा, खंडगाव, बेरळी बु, सावरगाव पी, लादगा, हिपरगा, सावरगाववाडी, शिरुर दबडे येथील गायराण व गावठाण जमिनीवर अनधिकृत कब्जा करुन मुरुमाचे उत्खनन करण्यात आले. रस्त्याची कामे शिल्लक असताना व शासनाने ठरवून दिलेल्या सोयी- सुविधांची अद्यापही पूर्तता झाली नसताना टोल वसुली सुरु करण्यात आली. याबाबत निवेदन देवूनही संबंधितांनी काहीही कारवाई केली नाही. एकूणच या प्रकाराच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने ५ जुलै रोजी शहरातील आंबेडकर पुतळ्याजवळील राज्य रस्त्यावर सहा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात माजी आ. सुभाष साबणे, शंकर पाटील ठाणेकर, शंकर पाटील लुटे, शंकर पोतदार, गंगाधर पिटलेवाड, शिवाजी गेडेवाड, गणपत गायकवाड, जगन्नाथ कामजे, माधव मुद्देवाड, जगदीश बियाणी, शंकर पोतदार, राजू लाडके, चंद्रकांत गरुडकर, विक्रम साबणे, व्यंकट लोहबंदे, नागनाथ लोखंडे, नासेरखान पठाण, मुमताज शेख, शेख बाबू, संगमेश्वर देवकते, राजू गंदपवाड, मनोज गौंड आदींनी सहभाग नोंदविला. (वार्ताहर)
सलगरा, खंडगाव, बेरळी बु, सावरगाव पी, लादगा, हिप्परगा, सावरगाववाडी, शिरुर दबडे येथील गायरान व गावठाणा जमिनीवर अनधिकृत कब्जा करुन मुरुमाचे उत्खनन केल्याचा आरोप
संबंधितांचे दुर्लक्ष