जिंतूर : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शौचालय बांधकामासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांपैकी १४५ कुटुंबांना माजी नगराध्यक्ष सचिन गोरे यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले. जिंंतूर शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी नगरपालिकेने जनजागृती मोहीम सुरू केली आहे. शौचालय नसलेल्या नागरिकांचे पालिकेच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले. शौचालय उपलब्ध नसलेल्या लाभार्थ्यांना शौचालय बांधकामासाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला. तसेच शहरात जनजागृती करण्यात आली. या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील १ हजार ४६९ जणांनी प्रस्ताव दाखल केले होते. छानणीअंती ४०० कुटुंब शौचालय बांधकामासाठी पात्र ठरविण्यात आले. या पात्र कुटुंंबापैकी १४५ कुटुंबांना नुकतेच नगरपालिकेच्या वतीने शौचालय बांधकामाचा पहिला ६ हजार रुपयांचा हप्ता धनादेशाद्वारे देण्यात आला. माजी नगराध्यक्ष सचिन गोरे, नगराध्यक्षा साधना पंडित दराडे, मुख्याधिकारी रा. ना. बोरगावकर, डॉ. पंडित दराडे, गटनेते अॅड. गोपाळ रोकडे, उपाध्यक्ष शेख सलीम, माजी उपाध्यक्ष रफीक, सभापती माजीदखॉ पठाण, नगरसेवक गणेश कुऱ्हे, अनिल घनसावंत, टीका खान पठाण, बाबा जोशी, अशोक बहिरट, गजानन रोकडे, माजी नगरसेवक रहेमान भाई, मुखीद भाई, पिंटू रोकडे, गंगा खिल्लारे, राजेश राठोड आदींची उपस्थिती होती. सर्वेक्षणासाठी नगर अभियंता चव्हाण, करनिरीक्षक साबळे, सालेह चाऊस आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
लाभार्थ्यांना शौचालय धनादेशाचे वाटप
By admin | Updated: January 16, 2016 23:24 IST