वाशीमध्ये दोन्ही काँगे्रस एकत्र
By Admin | Updated: March 14, 2017 23:56 IST2017-03-14T23:53:54+5:302017-03-14T23:56:27+5:30
वाशी : येथील पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येत शिवसेनेला विरोधी बाकावर बसविले.

वाशीमध्ये दोन्ही काँगे्रस एकत्र
वाशी : येथील पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येत शिवसेनेला विरोधी बाकावर बसविले. सभापतीपदी राष्ट्रवादीच्या भाग्यश्री हाके तर उपसभापतीपदी काँग्रेसचे विष्णु मुरकुटे यांची वर्णी लागली आहे.
वाशी पंचायत समितीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसकडे प्रत्येकी दोन सदस्य आहेत. आघाडीसाठी शिवसेनेच्या वतीने जोरदार प्रयत्न करण्यात आले होते. परंतु, प्रचारादरम्यान शिवसेना उपनेते तानाजी सावंत यांनी पारगाव येथील सभेत काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत चेडे यांच्यावर टिका केल्यामुळे संतप्त काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेसोबत आघाडी करण्यास नकार दिला. त्यामुळे अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी झाली. दरम्यान, मंगळवारी तहसीलदार शोभा पुजारी यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभापतीपदासाठी राष्ट्रवादीकडून सरमकुंडी गणातील भाग्यश्री हाके यांनी तर शिवसेनेकडून तेरखेडा गणातील रूपाली घोलप यांनी अर्ज दाखल केले. उपसभापतीपदासाठी काँग्रेसकडून विष्णु मुरकुटे यांनी व शिवसेनेकडून सविता तळेकर यांनी नामनिर्देशनपत्र भरले. हात वर करून मतदान घेण्यात आले असता सभापती व उपसभापतीपदासाठी प्रत्येकी चार मते मिळाली. तर तर विरोधात दोन मतदान झाले. त्यामुळे सभापतीपदी भाग्यश्री हाके तर उपसभापतीपदासाठी विष्णु मुरकुटे यांची निवड झाली. निवडीनंतर आ. राहूल मोटे व जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष प्रशांत चेडे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बिभीषण खामकर, जि.प.सदस्य मधुकर मोटे, काकासाहेब चौधरी, वडजीचे उपसरपंच सुनिल जाधवर, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष शामराव शिंदे, मनिष भराटे, रणजित गायकवाड, काकासाहेब मोेरे, मच्छिंद्र कवडे, कृषी उत्पन्न बाजर समितीचे सभापती प्रकाश मोटे,उपसभापती बी. एस. भराटे, नगर पंचायतीचे उपाध्यक्ष नितीन चेडे, गटनेते नागनाथ नाईकवाडी, नगरसेवक प्रसाद जोशी, सचिन येताळ, सुनिल पाटील, बाळासाहेब जाधव, हरिदास गायकवाड आदींची उपस्थिती होती. दरम्यान, पहिली अडीच वर्ष राष्ट्रवादीचा सभापती तर दुसऱ्या अडीच वर्षात काँग्रेसला संधी दिली जाणार असल्याचे समजते.