शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आग्या मोहोळाच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू; गतिमंद आई-वडिलांचा  एकमेव आधार हिरावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 17:38 IST

या हल्ल्यात चिमुकल्याची आई देखील गंभीर जखमी झाली होती

सिल्लोड: शेतात काम करत असताना आग्या मोहोळच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्याचा १० दिवसांनंतर उपचारादरम्यान शुक्रवारी ( दि. ३१) मृत्यू झाला. रुद्र शेषराव शिंदे (५  रा.धावडा) असे मृत मुलाचे नाव आहे. हा हल्ला २१ मार्च रोजी धावडा येथे झाला होता. 

२१ मार्च रोजी दुपारी १२ वाजता शांताबाई शेषराव शिंदे ( ४० ) या आपला मुलगा रुद्रला सोबत घेऊन धावडा येथील एका शेतात मजुरीचे काम करत होत्या. कापूस वेचत असताना अचानक झाडातून बाहेर आलेल्या आग्या मोहोळाच्या माश्यांनी शांताबाई आणि रुद्रवर हल्ला केला. गंभीर जखमी आई आणि मुलास सिल्लोड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात दोघांवर अधिक उपचार सुरु होते. दरम्यान, शांताबाई यांची प्रकृतीमध्ये सुधारणा झाली. मात्र, ३१ मार्च रोजी दुपारी १२ वाजता रुद्रचा मृत्यू झाला.

गतिमंद आई-वडिलांचा एकमेव आधारशांताबाई आणि त्यांचे पती गतिमंद आहेत. लग्नाच्या १५ वर्षानंतर रुद्रचा जन्म झाला होता. तोच त्यांचा एकमेव आधार होता. त्याच्या मृत्यूने हतबल आई-वडिलांचा आधार हिरावला गेला आहे. रुद्रच्या मृत्यूचा मोठा धक्का त्याच्या आईवडिलांना बसल्याची माहिती आत्या मीराबाई सोनवणे यांनी दिली. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी १ एप्रिल रोजी दुपारी अकस्मात मृत्यू दाखल केला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीDeathमृत्यू