शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकले बहीण-भाऊ खड्ड्यात पडले; दोन तरुणांनी जीव धोक्यात घालून बाहेर काढले, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 20:02 IST

खड्ड्यात पडल्याने पाण्यात बुडून चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू; बजाजनगरातील हृदयद्रावक घटना

- शेख मेहमुदवाळूज महानगर : मोकळ्या मैदानात खेळण्यासाठी गेलेल्या बहीण-भावाचा खोल खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी दुपारी बजाजनगरात घडली. चैताली राहुल देशमुख (११) व समर्थ राहुल देशमुख (७, दोघेही रा. बजाजनगर) या दोन चिमुकल्यांचा अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

विद्या राहुल देशमुख या दोन चिमुकल्यांसह तानाजी सरडे यांच्या घरात किरायाने राहतात. विद्या या एका कंपनीत काम करतात तर चैताली ही चौथीत व समर्थ हा इयत्ता दुसरीत होता. शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ही भावंडे एमआयडीसीचा मोकळा भूखंड (क्रमांक पी ३७) या ठिकाणी खेळण्यासाठी गेली. भूखंडावर मुरूम उत्खनन केल्याने भलामोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यात ड्रेनेजचे पाणी येत असल्याने तो १० ते १५ फूट पाण्याने भरलेला आहे. खेळत असताना चैताली व समर्थ तेथे पडल्याने बुडाले. हा प्रकार लक्षात येताच लगतच खेळत असलेल्या राजवीर विकास सबर (८) या चिमुकल्याने आरडाओरडा केला. मात्र जवळ कुणीही नसल्याने राजवीरने लगतच्या मैदानावर खेळणाऱ्या तरुणास पाण्यात दोन जण बुडाल्याचे सांगितले.

जीव धोक्यात घालून दोघा तरुणांनी भावंडांना काढले बाहेरही माहिती मिळताच न्यू सह्याद्री करिअर अकॅडमीमध्ये पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या विशाल मोरे व गणेश खांडेकर यांनी जीव धोक्यात घालून उड्या घेतल्या. तळाशी असलेल्या चैताली व समर्थ यांना पोलिस व नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले. घटनास्थळी आलेले दुय्यम निरीक्षक गणेश ताठे, उपनिरीक्षक स्वाती उचित, पो.कॉ. बाळू लहरे, तुकाराम पवार, मपोकॉ. प्रियांका तळवंदे यांनी दोघांना बेशुद्धावस्थेत शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWalujवाळूजDeathमृत्यू