शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
2
Delhi Blast : दिल्ली स्फोटात खळबळजनक खुलासा; घटनास्थळी सापडली 9mm ची ३ काडतुसं, पण...
3
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
4
कोचीन शिपयार्डपासून ते एचयूडीसीओपर्यंत; पुढच्या आठवड्यात कोणती कंपनी किती लाभांश देणार?
5
“काँग्रेस कधीच संपत नसते, जनतेचा विश्वास, पक्ष पुन्हा ताकदीने उभी राहतो”: रमेश चेन्नीथला
6
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
7
धक्कादायक! अमरावतीत धारणी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यूचे तांडव; तीन बालकांसह मातेचा मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
9
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
10
Bombay HC: सेबीशी तडजोड हा कारवाई रद्द करण्याचा आधार नाही, आयपीओ फेरफारसंबंधी याचिका फेटाळली
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
12
'प्रेम? ही तर ओव्हररेटेड भावना', धनुषच्या उत्तराने सर्वच चकित; क्रिती म्हणाली, 'मला नाही वाटत...'
13
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
14
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
15
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
16
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
17
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
18
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
19
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
20
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
Daily Top 2Weekly Top 5

खेळताखेळता घरासमोरील खड्ड्यातील पाण्यात पडले; चिमुकल्या बहीण-भावाचा करूण अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 12:33 IST

बराच वेळ दोन्ही भावंडे दिसत नसल्याने आजोबांनी त्यांचा शोध घेतला; काही तासांनी खड्ड्यात आढळले दोघांचे मृतदेह.

सिल्लोड : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे घरासमोरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तालुक्यातील मोढा बुद्रुक येथील कांबळे वस्तीत (मोहनबावाडी) घडली. हर्षदा गणेश कांबळे (वय ६ वर्षे) व रुद्र गणेश कांबळे (वय ३ वर्षे), अशी या चिमुकल्या मयतांची नावे आहेत.

सिल्लोड तालुक्यात बुधवार दुपारपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. गुरुवारी दिवसभरही पाऊस सुरू होता. या पावसामुळे सिल्लोड शहरालगत असलेल्या मोढा (बुद्रुक) शिवारातील कांबळे वस्ती येथील गणेश कांबळे यांच्या घरासमोरील खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. गणेश कांबळे यांची हर्षदा व रुद्र हे दोन मुले घराजवळ खेळत असताना नकळत ते खड्ड्याकडे गेले. कुणाला काही कळण्याच्या आतही दोघेही पाण्यात बुडाले. यात त्यांचा मृत्यू झाला. ही बाब कोणाच्याही लक्षात आली नाही. बराच वेळ दोन्ही भावंडे दिसत नसल्याने त्यांचे आजोबा श्रीरंग कांबळे यांनी दुपारी १ वाजता त्यांचा शोध घेतला असता त्यांना पाण्याकडे मुले गेल्याचे आठवले. त्यानुसार त्यांनी घरासमोर खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पाहिले असता त्यांना रुद्र मृत अवस्थेत आढळला. त्यांनी त्यास पाण्यातून काढून घरात आणले. यामुळे कांबळे वस्तीवर एकच आक्रोश सुरू झाला. यादरम्यान मुलगी हर्षदा कुठे आहे? अशी विचारणा झाली. पुन्हा त्या खड्ड्यातील पाण्यात या चिमुकलीचा शोध घेतला असता तिचा मृतदेह आढळला. यामुळे संपूर्ण वस्ती शोकसागरात बुडाली.

दरम्यान, दोन्ही मुलांना पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्यांना सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. रात्री उशिरा दोन्ही बालकांवर कांबळे वस्ती येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरDeathमृत्यू