जटवाडा अतिशय क्षेत्रावर आज वार्षिक यात्रोत्सव
By Admin | Updated: December 18, 2014 00:42 IST2014-12-17T23:48:39+5:302014-12-18T00:42:04+5:30
औरंगाबाद : श्री १००८ संकटहर पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र, जटवाडा येथे दि. १८ डिसेंबर रोजी वार्षिक यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

जटवाडा अतिशय क्षेत्रावर आज वार्षिक यात्रोत्सव
औरंगाबाद : श्री १००८ संकटहर पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र, जटवाडा येथे दि. १८ डिसेंबर रोजी वार्षिक यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पार्श्वनाथ भगवंतांच्या जन्मकल्याणक दिवसानिमित्त गुरुवारी सकाळी ८ पासून महाआरती, कल्याण मंदिर विधान पूजन, आहारचर्या, धर्मध्वजारोहण, सुमधूर साग्रसंगीताच्या सान्निध्यात महामस्तकाभिषेक, जैन मुनींचे प्रवचन, महाप्रसाद, सर्वसाधारण सभा, शास्त्रवाचन आदी कार्यक्रम दिवसभर होणार आहेत.
यात्रोत्सव प.पू. मुनीश्री १०८ गिरनारसागरजी महाराज, प.पू. संस्कारसागरजी महाराज, गणिनी आर्यिकारत्न श्री १०५ क्षमाश्री माताजी यांच्या मंगल सान्निध्यात पार पडणार आहे. औरंगाबादनिवासी फुलचंद, प्रमोदकुमार, कुणाल, भवित, सुषमा, रेखा, कुशानी दगडा परिवारातर्फे महाप्रसाद दिला जाईल. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वस्त मंडळ, यात्रा महोत्सव समिती, महामंत्री देवेंद्र काला यांनी केले आहे.
२७९१ दिव्यांनी महाआरती
गुरुवारी २७९१ दिव्यांनी महाआरती करण्यात येणार आहे.