आज एस.टी.चा ६६ वा वाढदिवस

By Admin | Updated: June 1, 2014 00:29 IST2014-06-01T00:05:24+5:302014-06-01T00:29:50+5:30

सोमनाथ खताळ , बीड १ जून १९४८ ला पहिली फेरी धावलेल्या एसटीचा वटवृक्ष अख्ख्या महाराष्ट्रभर डौलाने उभा झाला आहे.

Today's ST's 66th Birthday | आज एस.टी.चा ६६ वा वाढदिवस

आज एस.टी.चा ६६ वा वाढदिवस

सोमनाथ खताळ , बीड १ जून १९४८ ला पहिली फेरी धावलेल्या एसटीचा वटवृक्ष अख्ख्या महाराष्ट्रभर डौलाने उभा झाला आहे. ६६ वर्षांच्या सेवेद्वारे एसटीने प्रवाशांच्या मनात घट्ट स्थान निर्माण केले आहे. त्यामुळेच एसटीच्या गौरवशाली इतिहासावर यानिमित्ताने प्रकाश टाकण्यात येणार आहे. आज जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकात सनईचे सुर घुम प्रवाशांच्या कानावर पडणार असून विद्युत रोषणाईने स्थानकांचे रूपडंच पाटलणार आहे. गावखेड्यात जाणारी, अपंग, शाळकरी मुलांना सवलतीत शाळेत पोहोचणारी, अंध-अपंग, ज्येष्ठ नागरिकांना सवलत देणारी, कधी लग्नप्रसंगी दारात उभा राहणारी एसटी बस आज ६६ वर्षांची होत आहे. या ‘लालपरी’च्या वर्धापन दिनाची सध्या महामंडळाकडून जय्यत तयारी चालू आहे. एसटी महामंडळाच्या गौरवशाली इतिहासावर प्रकाश टाकण्यासाठी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्धार यावर्षी महामंडळाने घेतला आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकात सजावट करण्यात आली आहे. स्थानकात विद्युत रोषणाई करून प्रवेशद्वारावर रांगोळी काढून प्रवाशांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याची योजनाही आखली असल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी जी.एम. जगतकर यांनी सांगितले. विभागीय कार्यालयाकडून जिल्ह्यातील आठही आगारांना हा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करावा, असे पत्र पाठविण्यात आले आहे़ महामंडळाकडून प्रथमच असा वर्धापन दिन साजरा होत असल्याने याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत़ बसस्थानके दिसणार आकर्षक केळीचा खांब लावणे, आंब्यांच्या पानांची तोरणे बांधणे, डेपोमधील प्रत्येक ठिकाणी स्वच्छता, उपलब्ध फुलांची सजावट, रांगोळ्या, मंद आवाजात सनईवादन आदी उपक्रम राबवून हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. सर्व बस स्वच्छ कराव्यात तसेच बसस्थानकातून सुटणार्‍या गाड्यांमधील प्रवाशांचा प्रतिकात्मक गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात येणार आहे. उत्कृष्ट काम करणार्‍यांचा सत्कार या दिवसाचे औचित्य साधून प्रत्येक आगारातून चांगले केपीटीएल आणणारा चालक, सर्वात जास्त उत्पन्न आणणारा वाहक व यंत्र अभियांत्रिकी खात्यातर्फे विहित केलेल्या निकषानुसार चांगल्या यांत्रिक कारागिरांची निवड करण्यात येईल. १९ कर्मचार्‍यांना दिला निरोप परिवहन दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध आगारातील व विविध पदावरील १९ कर्मचार्‍यांना निरोप देण्यात आला़ ५८ वर्षांची सेवा देणार्‍या या कर्मचार्‍यांचा सत्कार करून त्यांना एक बॅग, पुष्पगुच्छ व कर्मचारी कुटुंब कल्याण योजनेअंतर्गत दोन हजारांचा धनादेश देण्यात आला़ सुलोचना टाक, भाऊसाहेब येवले, सदाशीव शिंदे, अंबादास वाघमारे, सीताराम गायकवाड, धर्मा मुळे, देवीदास सोळुंके, अब्दुल गफार अ़हाई, मच्छींद्र मस्के, साबेरा बेगम शेख मन्सुर, शकील अहमद खलील अहमद, सय्यद बाबाखाँ मियांभाई, भीमराव जोगदंड, पठाण मुबारक चाँद खान, नामदेव तिपुळे, किसन मोटे, चंदूलाल गौड, विठ्ठल मस्के या कर्मचार्‍यांचा समावेश आहे़ यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी जी़एम़ जगतकर, विभागीय कर्म वर्ग अधिकारी कुमार शिरशीकर, उपयंत्र अभियंता लांडगे, विभागीय लेखा अधिकारी चौधरी, स्टेनो अर्जून बोराडे यांची उपस्थिती होती़ सूत्रसंचालन शिरशीकर यांनी केले. हा उपक्रम राबवून एसटीबद्दल प्रवाशांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे़ या कार्यक्रमाचा लाभ जास्तीत-जास्त प्रवासी, कर्मचारी यांनी घ्यावा़ या कार्यक्रमाचा लाभ महामंडळाला नक्कीच होईल़ - पी़बी़नाईक, विभागीय नियंत्रक, बीड आम्ही या कार्यक्रमाबद्दल सर्व आगारप्रमुख, स्थानकप्रमुख यांना पत्र पाठविले आहेत़ कार्यक्रमाची पूर्ण तयारी झाली आहे़ एखादा आगारप्रमुख, स्थानकप्रमुख यामध्ये हालगर्जीपणा करीत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल़ आमचे प्रत्येक स्थानकावर लक्ष राहणार आहे़ -जी़एम़जगतकर, विभागीय वाहतूक अधिकारी, बीड महामंडळाच्या वतीने हा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे़ यासाठी प्रत्येक कर्मचारी, अधिकारी जोमाने कामाला लागला आहे़ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही एसटीबद्दल प्रवाशांमध्ये विश्वास देण्याचे काम करू़ प्रवाशांनी हा कार्यक्रम आपला आहे, असे समजून सहकार्य करावे़ -एस़एऩ महाजन, वाहतूक निरीक्षक, बीड एसटीचा वर्धापन दिनी आम्ही विविध कार्यक्रम घेत आहोत़ उत्कृष्ट चालक, वाहक, कामगार यांचा सत्कार करण्यात येणार आहे़ या सत्कारामुळे त्यांचा व इतर कर्मचार्‍यांचा काम करण्याचा उत्साह वाढेल़ -बाबा गर्कळ, वाहतूक नियंत्रक

Web Title: Today's ST's 66th Birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.