आज स्थायी समिती सभापती निवडणूक

By Admin | Updated: June 6, 2014 01:12 IST2014-06-06T00:54:01+5:302014-06-06T01:12:15+5:30

औरंगाबाद : मनपा स्थायी समिती सभापतीपदासाठी शिवसेनेकडून विजय वाघचौरे यांनी आज अर्ज दाखल केला. तर राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस

Today's Standing Committee Chairman Election | आज स्थायी समिती सभापती निवडणूक

आज स्थायी समिती सभापती निवडणूक

औरंगाबाद : मनपा स्थायी समिती सभापतीपदासाठी शिवसेनेकडून विजय वाघचौरे यांनी आज अर्ज दाखल केला. तर राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीकडून काशीनाथ कोकाटे आणि परवीन कैसर खान यांनी अर्ज दाखल केले आहेत.
युतीकडे ९ तर आघाडीकडे ७ इतके संख्याबळ आहे. त्यामुळे वाघचौरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा असून, मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच घोडेबाजारमुक्त अशी ही निवडणूक होत आहे. महापौर कला ओझा, आ. संजय शिरसाट, आ. प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, सभागृह नेते सुशील खेडकर, विकास जैन यांच्या उपस्थितीत अर्ज सादर केला.
यावेळी माजी आ.किशनचंद तनवाणी हे उपस्थित नव्हते. उद्या ६ जून रोजी सकाळी १० वा. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांच्या उपस्थितीत स्थायी समिती सभापतीची निवडणूक होईल. सेनेच्या वाट्याला तीन, तर भाजपाच्या वाट्याला दोन विषय समित्या आल्या आहेत. सेनेने तिन्ही सभापतीपदांवर महिलांना प्राधान्य दिले आहे.
आलेले अर्ज
सभापतीपदासाठी- विजय वाघचौरे (युती), काशीनाथ कोकाटे, परवीन कैसर खान (आघाडी)
महिला बालकल्याण समिती- कमल नरोट, सुनीता बरथुने (युती), फिरदौस फातेमा खान (काँग्रेस)
शिक्षण समिती- सविता सुरे, शहर सुधार समिती - सावित्री वाणी, आरोग्य समिती- पुष्पा सलामपुरे, समाजकल्याण समिती- बबन नरवडे.
युतीचे संख्याबळ :
त्र्यंबक तुपे, विजय वाघचौरे, अनिल जैस्वाल, जगदीश सिद्ध, सुरेंद्र कुलकर्णी, प्रीती तोतला. (सर्व शिवसेना) तर अनिल मकरिये, संजय चौधरी, ऊर्मिला चित्ते (भाजपा)
आघाडीचे संख्याबळ :
काशीनाथ कोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस), जहांगीर खान अब्बास खान, रवी कावडे काँगे्रस, तर परवीन कैसर खान (राष्ट्रवादी काँग्रेस), फिरदौस फातेमा खान, सत्यभामा शिंदे, मीर हिदायत अली (काँग्रेस).

Web Title: Today's Standing Committee Chairman Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.