दुष्काळाबाबत आज आढावा बैठक
By Admin | Updated: November 21, 2014 00:46 IST2014-11-21T00:33:37+5:302014-11-21T00:46:48+5:30
जालना : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीसंदर्भात राज्याचे महसूलमंत्री एकनाथराव खडसे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत

दुष्काळाबाबत आज आढावा बैठक
जालना : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीसंदर्भात राज्याचे महसूलमंत्री एकनाथराव खडसे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक होत आहे.
सकाळी १०.३० वाजता खडसे व मुंडे यांचे मुंबईहून हेलिकॉप्टरने जालना येथे आगमन होईल. तर दानवे यांचे पहाटे ६.२० वाजता मुंबईहून औरंगाबाद येथे विमानाने व नंतर जालन्यात मोटारीने आगमन होईल. जालना येथील बैठक आटोपून खडसे व मुंडे यांचे दुपारी बीडकडे प्रयाण होणार आहे.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, अप्पर जिल्हाधिकारी बी.एल. गिरी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, जालन्याच्या उपविभागीय अधिकारी मंजुषा मुथा, अंबडचे श्रीमंत हारकळ, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा कृषी अधीक्षक घाडगे यांच्यासह सर्व तहसीलदार उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मंत्रिमहोदयांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी सर्व खातेप्रमुखांची बैठक घेण्यात आली.
४जिल्ह्यातील पीक परिस्थिती, चारा टंचाई, रोजगार हमी योजना, पाटबंधारे विभाग, कृषी विभाग व इतर विविध विषयासंबंधी कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी नायक यांनी खाते प्रमुखांकडून घेतला. कामकाजासंबंधी केलेल्या उपाय योजनांबाबत तसेच त्रुटींबाबत मंजूर अनुदान व झालेला खर्च इत्यादी विविध माहिती जाणून घेतली.