जिल्ह्यातील ५८७ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान
By Admin | Updated: August 4, 2015 00:43 IST2015-08-04T00:43:31+5:302015-08-04T00:43:31+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यातील ५८७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रशासनाची यंत्रणा सज्ज झाली असून, मंगळवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान होईल.

जिल्ह्यातील ५८७ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान
औरंगाबाद : जिल्ह्यातील ५८७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रशासनाची यंत्रणा सज्ज झाली असून, मंगळवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान होईल. १२ हजार ७९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. ६ आॅगस्ट रोजी मतमोजणी होईल.
सुमारे ५ हजार मतदान यंत्रे आणि १ हजार ९४४ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. २५० निवडणूक निर्णय अधिकारी, २८० सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, १५१ क्षेत्रीय निवडणूक अधिकारी, २ हजार ७४ मतदान केंद्राध्यक्षांची नियुक्ती प्रशासनाने केली आहे. सुमारे ८ हजार ७८ कर्मचारी या मतदान प्रक्रियेत कार्यरत आहेत. ९ हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफाही बंदोबस्तासाठी देण्यात आला आहे. आॅनलाईन उमेदवारी अर्जांमुळे १७ हजार ३३३ अर्ज आले. २ टक्के अर्ज अवैध ठरले. यापूर्वी सरासरी २० टक्के अर्ज अवैध ठरले.
उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्याकडे औरंगाबाद, पैठण, अशोक खरात यांच्याकडे फुलंब्री, सोयगाव, सिल्लोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी. टी. केंद्रे यांच्याकडे कन्नड, खुलताबाद तर आर. के. ढवळे यांच्याकडे गंगापूर, वैजापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींची निरीक्षक म्हणून जबाबदारी आहे. त्यांच्या मदतीला संनियंत्रक अधिकारी आहेत. २४१५ बीओ आणि २१४५ सीओ मशीन्स तयार आहेत.