गंगाखेड येथे आज धम्म परिषदेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2016 23:23 IST2016-01-16T23:20:03+5:302016-01-16T23:23:38+5:30
गंगाखेड : धम्मचक्रप्रवर्तन दिनाचे औचित्य साधून चौथ्या धम्म परिषदेचे उद्घाटन १७ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे.

गंगाखेड येथे आज धम्म परिषदेचे उद्घाटन
गंगाखेड : धम्मचक्रप्रवर्तन दिनाचे औचित्य साधून चौथ्या धम्म परिषदेचे उद्घाटन १७ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे.
यानिमित्त सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, महात्मा फुलेनगर येथून धम्मरॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली वैष्णवी झोलकर मैदान येथे आल्यानंतर भदंत अभयपुत्र थायलंड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. तर भदंत आर. आनंद यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात येणार आहे. याप्रसंगी भदंत मुदीतानंद, भदंत महाविरो, भदंत विमलकीर्ती, भदंत संबोधी, भदंत आनंद सुमनगिरी, भदंत शाक्यपूत्र, भदंत एकतीस्स, भदंत सुजाततिस्स, भदंत पंत्रातिस्स यांच्यासह डॉ. रत्नाकर गुट्टे, आ.डॉ. मधुसूदन केंद्रे, अॅड. गौतमदादा भालेराव, रामप्रभू मुंडे, विलासराव जंगले, संतोष मुरकुटे, नंदकुमार पटेल, सुधाकर साळवे, प्रमोद साळवे, अशोक घोबाळे, राजेश फड, सुरेश बंडगर, सतीष घोबाळे, प्रभाकर मुरकुटे, भगवान सानप, अॅड. मनोज काकानी, संजय पारवे, अविनाश बरवे आदींची उपस्थिती राहणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. (प्रतिनिधी)