आजचे राशीभविष्य दिनांक २८ नोव्हेंबर २०२० डॉ. मनीषा देशपांडे औरंगाबाद
By | Updated: November 28, 2020 04:04 IST2020-11-28T04:04:29+5:302020-11-28T04:04:29+5:30
डॉ. मनीषा देशपांडे, औरंगाबाद शनिवार, दि. २८ नोव्हेंबर २०२० राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक अग्रहायन ७ , १९४२. तिथी : ...

आजचे राशीभविष्य दिनांक २८ नोव्हेंबर २०२० डॉ. मनीषा देशपांडे औरंगाबाद
डॉ. मनीषा देशपांडे, औरंगाबाद
शनिवार, दि. २८ नोव्हेंबर २०२०
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक अग्रहायन ७ , १९४२. तिथी : कार्तिक शुक्ल त्रयोदशी. श्री शालिवाहन शके १९४२. शार्वरी नाम संवत्सर , नक्षत्र: दुसरे दिवशी उत्तर रात्री ३:१९ पर्यंत भरणी. त्यानंतर कृत्तिका. रास: मेष. आज: चांगला दिवस. वैकुंठ चतुर्दशीचा उपवास. राहू काळ: सकाळी ९ ते १०:३० ते १२ (राहू काळात महत्त्वाची कामे टाळा)
.........................................
मेष :
घरच्या लोकांसाठी खर्च करावा लागेल. त्यातून मोठेपणा मिळेल. पण खिसा मात्र बराचसा हलका होईल. आईच्या मताप्रमाणे व्यापारात बदल केला तर चांगला फायदा होईल. कलाकारांनी पण आपल्या गुरूंचा सल्ला घेऊन भविष्याविषयीचे निर्णय घ्यावेत.
वृषभ :
भागीदारीत चांगले यश मिळेल. नवीन काम सध्या हाती घेऊ नका. उष्णतेचा त्रास होऊ शकतो. ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे मित्र भेटतील. त्यामुळे त्यांचा आनंद आणि उत्साह वाढेल.
मिथुन :
महत्त्वाचे व्यवहार करू नका. पैसा नक्की अडकण्याची शक्यता आहे. मामाच्या तब्येतीची काळजी घ्या. कदाचित त्यांना तुमच्या मदतीची गरज पडू शकते. नोकरीत सहकारी मित्रांना विश्वासात घेऊन काम करा.
कर्क :
मुलांच्या प्रगतीत अडथळे येतील. तुम्हाला स्वतः त्यात लक्ष घालावे लागेल. मुलांना समजून घ्या. काहींना आर्थिक प्रश्न त्रस्त करतील. नवीन ओळखीचा चांगला फायदा होईल. बरेच प्रश्न सुटतील.
सिंह :
जोडीदाराच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील. आर्थिक बाजू काहीशी कमी पडेल. पण संधीचा फायदा घ्या. वैद्यकीय क्षेत्रात काम करीत असतील त्यांना थकवा जाणवेल. काहींना तब्येतीच्या कुरबुरी असतील.
कन्या :
मुलांच्या शिक्षणाचा खर्च काहीसा वाढेल. मुलांना ताण होईल. त्यांच्याशी बोलून त्यांचे प्रश्न सोडवा. ज्येष्ठ मंडळींच्या आशीर्वादाने स्पर्धेत व परीक्षेत यश मिळेल. सर्वत्र कौतुक होईल. भाऊ बहीण यांची साथ पण मिळेल.
तुळ :
नोकरदार वर्गाचा कामाचा ताण वाढेल. जास्त जबाबदारी घ्यावी लागेल. बोलताना तुमचे विचार स्पष्ट मांडा. नाहीतर गैरसमज होण्याची शक्यता आहे. काहींना डोळ्याचा त्रास सतावेल. डोकेदुखी पण होईल.
वृश्चिक :
मन उत्साही राहील. डोक्यावरची जबाबदारी कमी होईल. त्यामुळे थोडे हलके वाटेल. काहींना प्रवास करावा लागेल. व्यापारी वर्गाला चोर, भामटे यांचा त्रास होईल. तरी जरा जागरूक राहा.
धनु :
काही कामे पूर्ण न झाल्यामुळे आपण उदास राहाल. नोकरदार वर्गाला बदलीची भीती सतावेल. मात्र काही घरात उत्साहाचे वातावरण राहील. कायदेशीर कामात गती येईल. मनासारखे निकाल लागतील.
मकर :
मुलांच्या तब्येतीची काळजी घ्या. तुमच्या बुद्धीचा उपयोग समाजकार्यासाठी होईल. कोणाला गरज असेल तर त्याला तुमच्या हातून मदत करता येईल. खाण्यापिण्याकडे नीट लक्ष द्या.
कुंभ :
बॅंका, पतसंस्था इत्यादी वित्त क्षेत्रात काम करणाऱ्यांनी जपून काम करावे. त्रास होऊ शकतो. कर्जाचे प्रकरणाचे काम चिघळू शकते. काही वेळ वाट पहावी लागेल. आईचा आशीर्वाद कामी येईल.
मीन :
आज फार निकडीचे काम असल्याशिवाय प्रवास करू नका. चोरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे. नवीन वस्तू खरेदी करण्याचा बेत ठरेल. तसेच माहेरून बोलावणे आल्यामुळे महिलावर्ग खूश राहील.