आज जॉन्सन अॅण्ड जॉन्सन व ‘लोकमत’तर्फे हेल्दी बेबी कॅम्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2016 00:50 IST2016-07-23T00:35:28+5:302016-07-23T00:50:38+5:30
जालना : हेल्दी बेबी कॅम्प ही जागृत करणारी संकल्पना घेऊन जॉन्सन अण्ड जॉन्सन व लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कॅम्पचे शनिवारी दुपारी १ वाजता खेरुडकर मंगल कार्यालयात आयोजन केले आहे.

आज जॉन्सन अॅण्ड जॉन्सन व ‘लोकमत’तर्फे हेल्दी बेबी कॅम्प
जालना : हेल्दी बेबी कॅम्प ही जागृत करणारी संकल्पना घेऊन जॉन्सन अण्ड जॉन्सन व लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कॅम्पचे शनिवारी दुपारी १ वाजता खेरुडकर मंगल कार्यालयात आयोजन केले आहे. या कार्यक्रमात सहभागी होऊन जागरुक पालकांची भूमिका निभावण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
चांगली व स्वस्थ मुले, निरोगी कुटुंब, जाणकार समाज आणि समृृध्द भारत अशा टप्प्याटप्प्याने विकसीत होणारी आपली संस्कृती आणि त्यात घडविणे ही मोठी जबाबदारी जॉन्सन आणि जॉन्सन हा सर्वाधिक मातांचा लाडका ब्रॅण्ड आणि सामाजिक बांधिलकी जपत क्रांती घडविणारे वृत्तपत्र म्हणजे लोकमत यांनी या दृष्टिने हे पाऊल उचलून वेगळी संकल्पना मांडली आहे. १०० हून अधिक वर्षांसाठी जॉन्सन बेबी हे बाळाच्या सुश्रृषा विज्ञानामध्ये आघाडीवर राहिले आहे. ज्यातून पिढी दर पिढी प्रत्येक पालकाने आपल्या बाळाला दिलेला विश्वासाचा स्पर्श आहे. जॉन्सन अॅन्ड जॉन्सन आणि लोकमत वृत्तपत्र समूहाने आयोजित केलेला हा कॅम्प एका निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न होय. या कार्यक्रमात सहभागी होऊन जागरुक पालकांची भूमिका निभावण्याची संधी या निमित्ताने जॉन्सन अॅण्ड जॉन्सन व लोकमत यांनी दिली आहे. आयएपी (इंडियन अॅकेडमी आॅफ पेडियाट्रिक्स) ही भारतातील बालरोग चिकित्सकांची सर्वाधिक प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे जी आरोग्याच्या सुधारणेसाठी आणि बाळांच्या हितासाठी सतत झटत असते. या कॅम्पमध्ये बाळांच्या आरोग्याशी संबंधित अनेक प्रश्नांचा विचार करुन त्यावर मार्गदर्शन केले जाईल. (प्रतिनिधी)
हा कॅम्प शुन्य ते पाच वयोगटातील बालकासांठी आहे. शनिवारी दुपारी १२ वाजता जुना जालना भागातील खेरुडकर मंगल कार्यालयात हा कॅम्प नि:शुल्क होत असून सर्व पालकांनी नाव नोंदणीसाठी ७७०९५२४५६० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नाव नोंदणी सकाळी ११ वाजेपर्यंत केली जाणार आहे.