आज सर्वसाधारण सभा
By Admin | Updated: May 30, 2017 00:36 IST2017-05-30T00:34:25+5:302017-05-30T00:36:33+5:30
जालना : नगरपालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी सकाळी अकरा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

आज सर्वसाधारण सभा
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नगरपालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी सकाळी अकरा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
सभेची नोटीस व विषय पत्रिका पालिका सदस्यांना पाठविण्यात आली आहे. सर्वसाधारण सभेत शहरातील विकास कामांशी निगडित विविध ठराव सभागृहापुढे चर्चेसाठी ठेवले जाणार आहे.
दरम्यान, विरोध पक्षातील सदस्य शहरातील संथ गतीने सुरू असलेली रस्त्यांची कामे व मूलभूत सुविधांच्या मुद्द्यावर आक्रमक होण्याची शक्यता आहे.