आज सखी मंच सदस्यांसाठी ‘वऱ्हाड निघालं लंडनला’ नाटक
By Admin | Updated: July 11, 2014 01:03 IST2014-07-11T00:07:43+5:302014-07-11T01:03:31+5:30
वसमत : हजारो शोनंतरही के्रज कायम असलेल्या ‘वऱ्हाड निघालं लंडनला’ या एकपात्री नाटकाचा प्रयोग आता ‘लोकमत’ सखीमंचच्या सदस्यांसाठी आयोजित करण्यात आला आहे.

आज सखी मंच सदस्यांसाठी ‘वऱ्हाड निघालं लंडनला’ नाटक
वसमत : हजारो शोनंतरही के्रज कायम असलेल्या ‘वऱ्हाड निघालं लंडनला’ या एकपात्री नाटकाचा प्रयोग आता ‘लोकमत’ सखीमंचच्या सदस्यांसाठी आयोजित करण्यात आला आहे. येत्या ११ जुलै रोजी दुपारी २.३० वाजता वसमत शहरातील सखींसाठी व्यंकटेश्वरा मंगल कार्यालयात हे नाटक सादर केले जाणार आहे.
महाराष्ट्राचे विनोदी अभिनेते पु.ल. देशपांडे लिखीत ‘वऱ्हाड निघालं लंडनला’ या नाटकाचे आयोजन ‘लोकमत’ संखीमंचच्या सदस्यांसाठी करण्यात आले आहे.
११ जुलैै रोजी वसमत शहरातील व्यंकटेश्वरा मंगल कार्यालयात दुपारी अडीच वाजता सिनेकलाकार संदीप पाठक यांच्याकडून हे नाटक सादर करण्यात येणार आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)