आज वऱ्हाड निघालंय लंडनला
By Admin | Updated: July 13, 2014 00:22 IST2014-07-13T00:02:58+5:302014-07-13T00:22:12+5:30
परभणी : लोकमत सखीमंच आणि बालविकास मंचच्या वतीने १३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता वऱ्हाड निघालंय लंडनला या नाटकाचे आयोजन केले आहे़ हरिप्रसाद मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होईल़
आज वऱ्हाड निघालंय लंडनला
परभणी : लोकमत सखीमंच आणि बालविकास मंचच्या वतीने १३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता वऱ्हाड निघालंय लंडनला या नाटकाचे आयोजन केले आहे़ हरिप्रसाद मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होईल़
लोकमतने सखीमंच आणि बालविकास मंचच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेतले आहेत़ यावर्षी नाट्यप्रयोग, वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करून सदस्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी खास व्यासपीठ उभे केले आहे़ यावर्षी असे अनेक उपक्रम पार पडले़ त्याचाच एक भाग म्हणून या नाट्यप्रयोगाचे आयोजन केले आहे़ संदीप पाठक हे वऱ्हाड निघालंय लंडनला हे नाटक सादर करणार आहेत़ येथील साई बेन्टेक्स ज्वेलरीचे बाळासाहेब घिके हे या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत़
याच कार्यक्रमामध्ये श्री साई बेन्टेक्स ज्वेलरीचा लकी ड्रॉ देखील काढण्यात येणार आहे़ कार्यक्रम वेळेवर सुरू होणार असल्याने सखीमंच आणि बालविकास मंचच्या सदस्यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन लोकमतच्या वतीने करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)