मतदार नोंदणीसाठी आज विशेष मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:53 IST2017-07-22T00:48:56+5:302017-07-22T00:53:13+5:30
नांदेड: जिल्ह्यातील २ हजार ८३१ मतदान केंद्रांवर २२ जुलै रोजी मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे़

मतदार नोंदणीसाठी आज विशेष मोहीम
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: जिल्ह्यातील २ हजार ८३१ मतदान केंद्रांवर २२ जुलै रोजी मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे़ १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे़
सर्व तहसील कार्यालयातील मतदार मदत केंद्र व संबंधित बीएलओंकडे ३१ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत़ मतदार यादीत नाव नोंदणी, नावात दुरुस्ती, आक्षेप नोंदविण्यासाठी ३१ जुलैपर्यंतचा कालावधी निश्चित केला आहे़ जिल्ह्यात एकूण २३ लाख ७४ हजार ३०३ एवढी मतदारसंख्या असून त्यामध्ये १२ लाख ४१ हजार ४७० पुरुष तर ११ लाख ३२ हजार ७८० महिलांचा समावेश आहे़ ५ जानेवारी २०१७ नंतर नोंदणी केलेल्या मतदारांना ओळखपत्रांचे वाटप केले जाणार आहे़ शनिवारी आयोजित मतदार नोंदणी शिबिरांना सहायक मतदार नोंदणी अधिकारी भेटी देणार आहेत़ यावेळी अनुपस्थित राहणाऱ्या बीएलओंवर कारवाई करण्यात येणार आहे़