आज ‘रिमझिम गाणी झलक सुहानी..’

By Admin | Updated: July 25, 2016 01:04 IST2016-07-25T00:15:24+5:302016-07-25T01:04:55+5:30

औरंगाबाद : आला पुन्हा तो नव्यानं.. ओला मातीचा सुगंध.. मन झाले एकवार.. पुन्हा बेहोश बेधुंद.. पावसामुळे निसर्गाने जणू हिरवा शालू पांघरला आहे.

Today 'Rimzim Songs Thakal Suhani ...' | आज ‘रिमझिम गाणी झलक सुहानी..’

आज ‘रिमझिम गाणी झलक सुहानी..’

औरंगाबाद : आला पुन्हा तो नव्यानं.. ओला मातीचा सुगंध.. मन झाले एकवार.. पुन्हा बेहोश बेधुंद..
पावसामुळे निसर्गाने जणू हिरवा शालू पांघरला आहे. रसिकतेला फुलविणाऱ्या या रोमांचक वातावरणात हळूच सुरेल तान कानावर पडावी अन् मन बेभान होऊन नाचू गाऊ लागावे असे वाटते. नेमका या वातावरणाचा रंग आणि आपल्या असंख्य प्रेक्षकांच्या मनातील भाव ओळखून पुन्हा एकदा कलर्स प्रस्तुत लोकमत सखी मंच घेऊन येत आहे ‘रिमझिम गाणी झलक सुहानी’.
गोवा आणि महाराष्ट्रात ज्याप्रमाणे लोकमत सखी मंचने आपल्या सदस्यांसाठी विविधरंगी कार्यक्रम देऊन त्यांच्या मनात घर केलं, त्याचप्रमाणे कलर्सने देखील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा कलर्स व लोकमत सखी मंच आपल्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमात असणार आहेत आपल्या मनातली पाऊस गाणी आणि सोबतच नृत्याची ‘झलक दिखला जा’ स्पर्धा.
पुन्हा एकदा कलर्स चॅनलवर ३० जुलै, शनिवारपासून रात्री १० वा. ‘झलक दिखला जा हॉट है’ हा शो सुरू होणार आहे. यावेळचे मुख्य आकर्षण म्हणजे २००६ ची मिस युनिव्हर्स श्रीलंका आणि सुप्रसिद्ध मॉडेल तसेच अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस या कार्यक्रमाची सेलिब्रिटी जज असणार आहे. तिच्या सहभागाने या कार्यक्रमाला आलेले एक ग्लॅमरस आणि सिझलिंग स्वरूप या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असेल. याशिवाय दिग्दर्शक करण जोहर, कोरिओग्राफर गणेश हेगडे हे सुद्धा परीक्षकांच्या भूमिकेत धमाल करताना दिसणार आहेत. एकूण १२ सेलिबिटीज या कार्यक्रमात सहभागी होणार असून यात सुरवीन चावला, करिश्मा तन्ना, शक्ती अरोरा, अर्जुन बिजलानी, गौरव गेरा (चुटकी फेम), पूनम शहा- प्रियंका शहा (जुळ्या बहिणी), हरपालसिंग सोखी (शेफ), हेली शाह, नोरा फतेही, सलमान युसुफ खान, सिद्धांत गुप्ता आणि शंतनू माहेश्वरी आदींचा समावेश आहे.
दि. २५ जुलै रोजी सायं. ४ : ३० वा. संत तुकाराम नाट्यगृह (सिडको) येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सर्व सखी मंच सदस्यांसाठी हा कार्यक्रम खुला आहे.

Web Title: Today 'Rimzim Songs Thakal Suhani ...'