आजपासून विद्यार्थ्यांना देणार मोबाईलवर प्रवेशाची सूचना

By Admin | Updated: July 18, 2014 01:53 IST2014-07-18T01:21:47+5:302014-07-18T01:53:13+5:30

औरंगाबाद : प्रवेशासाठी आॅनलाईन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना उद्यापासून ‘आयटीआय’चे कर्मचारी मोबाईलवर संपर्क साधून प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी सूचना देणार आहेत.

From today onwards students will be advised to access the mobile | आजपासून विद्यार्थ्यांना देणार मोबाईलवर प्रवेशाची सूचना

आजपासून विद्यार्थ्यांना देणार मोबाईलवर प्रवेशाची सूचना

औरंगाबाद : दहावीनंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी आॅनलाईन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना उद्यापासून ‘आयटीआय’चे कर्मचारी मोबाईलवर संपर्क साधून प्रवेश अर्ज निश्चित (कन्फर्मेशन) करण्यासाठी सूचना देणार आहेत.
राज्यात १ लाख २५ हजार ‘आयटीआय’च्या जागांसाठी २ लाख ३१ हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केलेली असून, आजपर्यंत १ लाख ४२ हजार विद्यार्थ्यांनी जवळच्या ‘आयटीआय’मध्ये जाऊन आपले प्रवेश अर्ज निश्चित केले आहेत. औरंगाबादेतील एकट्या मुलांच्या ‘आयटीआय’साठी १,२१६ जागांसाठी १,६०० विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज निश्चित केले आहेत.
२२ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आॅनलाईन नोंदणी व अर्ज निश्चिती करावी लागेल. यासाठी उद्यापासून औरंगाबादेतील ‘आयटीआय’चे कर्मचारी आॅनलाईन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना मोबाईलवर संपर्क साधून त्यांना आपले अर्ज निश्चित करण्यासाठी सूचना देणार आहेत. विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केलेली पावती व प्रवेश अर्ज निश्चित करण्याचे शुल्क जवळच्या कोणत्याही ‘आयटीआय’मध्ये भरल्यानंतर प्रवेश नोंदणी पावतीवर त्या आयटीआयचा शिक्का घेणे बंधनकारक आहे. २४ जुलै रोजी संकेतस्थळावर प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.

Web Title: From today onwards students will be advised to access the mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.