आज सचखंड येथे नगरकीर्तन
By Admin | Updated: October 7, 2014 00:13 IST2014-10-07T00:05:59+5:302014-10-07T00:13:32+5:30
अमरिकसिंघ वासरीकर, नांदेड मातासाहिब देवाजींच्या तीन दिवसीय जन्मोत्सव कार्यक्रमाचा समारोप ७ आॅक्टोबर रोजी होणार असून दुपारी दोन वाजता मातासाहिब गुरुद्वारा ते सचखंड नगरकीर्तन काढण्यात येणार आहे.

आज सचखंड येथे नगरकीर्तन
अमरिकसिंघ वासरीकर, नांदेड
मातासाहिब देवाजींच्या तीन दिवसीय जन्मोत्सव कार्यक्रमाचा समारोप ७ आॅक्टोबर रोजी होणार असून दुपारी दोन वाजता मातासाहिब गुरुद्वारा ते सचखंड नगरकीर्तन काढण्यात येणार आहे. या नगरकीर्तनात घोड्यांसह निशानसाहिबही सहभागी होणार आहेत.
मातासाहिब देवाजींच्या ३३३ व्या जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे मातासाहिब गुरुद्वारा मुगट येथे आयोजन केले होते. ५ आॅक्टोबर रोजी प्रारंभ झालेल्या या कार्यक्रमात सकाळ व सायंकाळी विविध नामवंत रागी जत्थ्यांनी आपली हजेरी लावली. यानिमित्त ६ आॅक्टोबर रोजी घोड्यांच्या शर्यतीचेही आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदविलेल्या घोडस्वारांनी प्रदर्शन केले. ७ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत कीर्तन समागमाचे आयोजन केले आहे. यात भाई चमनजितसिंघजी लाल, ग्यानी पिंदरपालसिंघजी कथाकार, भाई अमरजितसिंघजी पटीयाला यांची हजेरी लागणार आहे.
दुपारी दोन वाजता गुरुद्वारा मातासाहिब येथील कार्यक्रमाचे समापन करुन सचखंडकरिता नगरकीर्तन काढण्यात येणार आहे. हे नगरकीर्तन हिराघाट, त्रिकुट, माळटेकडी, महाराणा प्रताप चौक, अण्णाभाऊ साठे चौक, भगतसिंघरोड, जुना मोंढा, गुरुद्वारा चौरस्ता मार्गे सचखंड येथे येणार आहे. या नगरकीर्तनात निशानसाहिब, गुरुसाहिबांचे घोडे, कीर्तनी जत्थे, भजनी मंडळ, गतका आखाडे सहभागी होणार आहेत. पंजाबमधून आलेले विविध दल आपल्या घोडस्वारांसह नगरकीर्तनात राहणार आहेत. या नगरकीर्तनात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गुरुद्वारा मातासाहिबचे जत्थेदार संतबाबा प्रेमसिंघजी, गुरुद्वारा लंगरसाहिबचे जत्थेदार संतबाबा बलविंदरसिंघजी, संतबाबा नरेंद्रसिंघजी यांनी केले आहे.