आज मेडिकल सीईटी
By Admin | Updated: May 8, 2014 00:22 IST2014-05-08T00:21:46+5:302014-05-08T00:22:14+5:30
औरंगाबाद : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमासाठी एमएच-सीईटी -२०१४ ही सामाईक प्रवेशपूर्व परीक्षा ८ मे रोजी आयोजित करण्यात आली आहे.

आज मेडिकल सीईटी
औरंगाबाद : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमासाठी एमएच-सीईटी -२०१४ ही सामाईक प्रवेशपूर्व परीक्षा ८ मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी राज्यातून सुमारे १ लाख ५३ हजार २३३, तर औरंगाबाद जिल्ह्यातून ६ हजार ९९४ विद्यार्थी बसणार आहेत. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या एमबीबीएस, बीडीएस, बीएचएमएस अशा अभ्यासक्रमाच्या सुमारे १२४ महाविद्यालयांतील ५ हजार ७१० जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी ८ मे रोजी राज्यभर सीईटी होत आहे. सकाळी ९.१५ वाजता सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर हजर राहावे लागणार आहे. सकाळी १० ते १ वाजेदरम्यान ही परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी शासननियुक्त औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हा संपर्क अधिकारी डॉ. मिर्झा सिराज बेग यांनी याविषयी सांगितले की, सकाळी १० वाजेनंतर कोणत्याही विद्यार्थ्यास प्रवेश दिला जाणार नाही. जिल्ह्यातील १७ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेश पत्र (हॉल तिकीट) संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत. शिवाय कोणालाही परीक्षा केंद्रामध्ये मोबाईल फोन, पेजर, लॅपटॉप, कॅल्क्युलेटर नेण्यास सक्त मनाई आहे. विद्यार्थ्यांनी काळा बॉल पेन, प्रवेश कार्ड, शाळा किंवा महाविद्यालयाचे ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक आहे. परीक्षार्थींशिवाय कोणत्याही व्यक्तीस प्रवेश केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. शिवाय परीक्षा संपेपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र सोडून बाहेर पडता येणार नाही. या परीक्षेचा निकाल १४ जून रोजी जाहीर होणार आहे. परीक्षा केंद्राबाहेर १४४ कलम लागू परीक्षा शांततेत पार पडावी, यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्ताची आखणी केली आहे. परीक्षा कें द्र परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या कलमानुसार दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या जमावाला परीक्षा केंद्राच्या १०० मीटरच्या परिसरात प्रतिबंध करण्यात आला आहे.