आज ‘लोकमत’ सखी सन्मान सोहळा

By Admin | Updated: October 22, 2016 00:24 IST2016-10-22T00:07:25+5:302016-10-22T00:24:26+5:30

बीड : ‘लोकमत’ सखी मंच आयोजित सखी सन्मान सोहळा शनिवारी पार पडणार आहे. यावेळी विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजविणाऱ्या सखींचा सन्मान मोठ्या थाटात होणार आहे

Today, 'Lokmat' will be honored with the honor | आज ‘लोकमत’ सखी सन्मान सोहळा

आज ‘लोकमत’ सखी सन्मान सोहळा


बीड : ‘लोकमत’ सखी मंच आयोजित सखी सन्मान सोहळा शनिवारी पार पडणार आहे. यावेळी विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजविणाऱ्या सखींचा सन्मान मोठ्या थाटात होणार आहे. येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दुपारी ४ वाजता सोहळ्यास सुरुवात होणार आहे.
सखी मंचतर्फे महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी २०११ पासून या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षी वैद्यकीय, सामाजिक, सांस्कृतिक-साहित्यीक, शौर्य, क्रीडा, शैक्षणिक, व्यावसायिक- औद्योगिक या क्षेत्रात आपली अमीट छाप सोडणाऱ्या महिलांना मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात येणार आहे. प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. सचिन ज्वेलर्स, पिंगळे गल्ली, बीड हे या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत.
हिंदी-मराठी गितांचा सुरेल नजराणा हे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. सखींनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आहे. (प्रतिनिधी)
पुरस्कार वितरण कार्यक्रमापूर्वी शनिवारी दुपारी २:३० ते ३:३० या दरम्यान खास दिवाळीनिमित्त सखींकरता फराळ स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये सखींनी गोड किंवा तिखट यापैकी एकच पदार्थ घरुन बनवून आणायचा आहे. पदार्थ सादर करण्यासाठी दहा मिनिटांचा अवधी आहे. या पदार्थाची चव चाखून परीक्षक विजेत्यांची निवड करणार आहेत.

Web Title: Today, 'Lokmat' will be honored with the honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.