देखभाल, दुरुस्तीसाठी आज पुन्हा लोडशेडिंग
By Admin | Updated: May 27, 2016 00:05 IST2016-05-26T23:49:00+5:302016-05-27T00:05:48+5:30
औरंगाबाद : महावितरण कंपनीकडून देखभाल, दुरुस्तीच्या कामासाठी उद्या शुक्रवारी शहरात पुन्हा लोडशेडिंग घेण्यात येणार आहे.

देखभाल, दुरुस्तीसाठी आज पुन्हा लोडशेडिंग
औरंगाबाद : महावितरण कंपनीकडून देखभाल, दुरुस्तीच्या कामासाठी उद्या शुक्रवारी शहरात पुन्हा लोडशेडिंग घेण्यात येणार आहे. सातारा, देवळाई, बीड बायपास, छावणीसह शहरातील अनेक भागातील सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पावसाळ्याच्या तोंडावर महावितरण कंपनीने महिनाभरापासून देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. याआधी दोन शुक्रवारी शहरात चार ते सहा तास वीज पुरवठा बंद ठेवून अशी कामे करण्यात आली. आता उद्या शुक्रवारी औरंगाबाद शहर विभाग २ मध्ये देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. छावणी उपकेंद्रातील छावणी फीडर, वाळूज-पंढरपूर भागातील बजाजनगर, मोरे चौक, प्रताप चौक, ए सेक्टर, सी सेक्टर, एक्स सेक्टर, डब्ल्यू सेक्टर, सातारा भागात देवळाई चौक, वैजंतीनगर, मुकुंदवाडी, बीड बायपास, बाळापूर, नक्षत्रवाडी, इटखेडा, नाथ व्हॅली स्कूल, आॅरेंज सिटी, पडेगाव, बेस्ट प्राईज, वाल्मी इत्यादी भागात सकाळी ८ ते १२, ९ ते १२, १० ते २ या वेळेत वीज बंद ठेवून तारांमध्ये येणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडणे, वीज वाहिन्यांतील किरकोळ दुरुस्ती करणे आदी कामे केली जाणार असल्याचे महावितरणने कळविले आहे.