पीकविमा काढण्यास आज शेवटचा दिवस

By Admin | Updated: June 30, 2014 00:38 IST2014-06-30T00:13:34+5:302014-06-30T00:38:18+5:30

नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या हितासाठी हवामान आधारित पीकविमा योजना काढली आहे.

Today is the last day to remove the crop | पीकविमा काढण्यास आज शेवटचा दिवस

पीकविमा काढण्यास आज शेवटचा दिवस

नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या हितासाठी हवामान आधारित पीकविमा योजना काढली आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा़़ विमा काढण्याचा आजचा शेवटचा दिवस असून शेतकऱ्यांनी विमा काढून घ्यावा, असे आवाहन नांदेड उत्तर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल पावडे यांनी केले आहे.
पाऊस न पडल्यामुळे हवामानाची परिस्थिती सध्या चिंताजनक आहे. म्हणून शेतकऱ्यांनी निष्काळजीपणा न करता आपल्या पिकाचा विमा काढावा, आपल्या गावच्या दत्तक बँकेत अथवा कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत हा विमा काढता येतो. शासनाने या योजनेसाठी नांदड जिल्ह्यातील चार पिकांची निवड केली आहे. यामध्ये कापूस, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांचा समावेश आहे. हा पीकविमा काढण्याची अंतिम तारीख ३० जून आहे. विमा काढताना काही अडचण आल्यास कृषी सेवकांशी संपर्क साधावा, असे आवाहन पावडे यांनी केले़ उपाध्यक्ष उमेश कोटलवार, सरचिटणीस किशन कल्याणकर, महेश देशमुख, प्रदीप मुळे, महेश मगर, गोपी मुदीराज, अतुल वाघ, रहिम पटेल, सुषमा थोरात आदींची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)
पीकविमा काढण्यास मुदतवाढ द्या - देवसरकर
जून महिना संपत आला तरी पाऊस झाला नाही़ पावसाअभावी पेरण्या खोळंबल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे़ अशा स्थितीत शेतकऱ्यांना पीकविमा काढण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदमवाढ द्यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष माधव देवसरकर यांनी केली आहे़

Web Title: Today is the last day to remove the crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.