राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते आज विकासकामांचे उद्घाटन

By Admin | Updated: June 28, 2014 01:21 IST2014-06-28T01:08:46+5:302014-06-28T01:21:10+5:30

औरंगाबाद : शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या आमदार निधीतील व खा. विजय दर्डा यांच्या खासदार निधीतील विविध विकासकामांचे उद्घाटन उद्या २८ जून रोजी सायंकाळी ५ ते ७ वाजेदरम्यान होणार आहे.

Today inaugurated development works at the hands of Rajendra Darda | राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते आज विकासकामांचे उद्घाटन

राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते आज विकासकामांचे उद्घाटन

औरंगाबाद : शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या आमदार निधीतील व खा. विजय दर्डा यांच्या खासदार निधीतील विविध विकासकामांचे उद्घाटन उद्या २८ जून रोजी सायंकाळी ५ ते ७ वाजेदरम्यान होणार आहे.
सायंकाळी ५ वा. खा. विजय दर्डा यांच्या निधीतून बांधण्यात आलेल्या वॉर्ड क्र. २५ अयोध्यानगर येथील एन-७, सी-१८ व सी-२५ समोरील जागेतील सामाजिक सभागृहाचे उद्घाटन होईल. सायं.५.३० वा. शिक्षणमंत्र्यांच्या आमदार निधीतून वॉर्ड क्र.४९ गुलमोहर कॉलनीमधील विजयश्री कॉलनीतील डांबरीकरण कामाचे उद्घाटन होईल.
सायंकाळी ६.३० वा. आमदार निधीतून वॉर्ड क्र. ७३ एस.टी. कॉलनी, जयभवानीनगर येथील भागवत भारती यांच्या घरासमोरील सिमेंट रस्त्याच्या कामाचे व त्यानंतर सायं. ६.४५ वा. वॉर्ड क्र. ८१ जयभवानीनगर येथील गल्ली नं.२ मधील सिमेंट रस्त्याचे उद्घाटन होईल. सायं. ७ वा. वॉर्ड क्र. ८१ येथील गल्ली नं. १२ येथे डी.पी.पासून ते विश्वकर्मा चौकापर्यंत सिमेंट रस्त्याच्या कामाचे उद्घाटन होईल.

Web Title: Today inaugurated development works at the hands of Rajendra Darda