शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

आज छत्रपती संभाजीनगरात अनेक भागात वीजपुरवठा बंद, जाणून घ्या ठिकाण अन् वेळ

By साहेबराव हिवराळे | Published: May 03, 2024 1:00 PM

शहरातील काही भागांत देखभाल व दुरुस्तीची अत्यावश्यक कामे महावितरण करणार आहे

छत्रपती संभाजीनगर : देखभाल व दुरुस्तीच्या अत्यावश्यक कामासाठी शहरातील अनेक भागांत शुक्रवारी (३ मे) काही काळ वीजपुरवठा बंद राहील, असे महावितरणने कळवले आहे.

शुक्रवारी सकाळी ८ ते १२ पर्यंत औरंगपुरा, समर्थनगर व सीपी ऑफिस फीडरवरील सर्व भाग, सकाळी १० ते २ वाजेपर्यंत मयूरनगर, एन-११, एन-१२, लुणार सोसायटी, सिद्धार्थनगर, जमनज्योती, फकीरवाडी, यासिननगर, हर्सूल गाव, जटवाडा रोड, चेतनानगर, जहांगीर कॉलनी, बेरीबाग, कोलठाणवाडी रोड, भगतसिंगनगर, हर्सूल ते पिसादेवी रोड, भीमटेकडी, बेघर योजना, होनाजीनगर, सारावैभव, सईदा कॉलनी, अंबरहिल ते एव्हरेस्ट कॉलेज परिसर, 

सकाळी १० ते २ वाजेपर्यंत प्रतापनगर, शहानूरवाडी, ज्योतीनगर, चौसरनगर, दर्गा परिसर, भीमगड, कासलीवाल रेसिडेन्सी, चाणक्यपुरी, शम्सनगर, देवानगरी, दशमेशविहार, काशय गार्डन, परदेशी टॉवर, झांबड कॉर्नर, विशान रेसिडेन्सी, तुळजाईनगर, इंदिरानगर, गादियानगर, शिवराज कॉलनी, केशवनगरी, देशपांडेपूरम, मयूरबन कॉलनी, रायनगर, सकाळी १० ते २ पर्यंत जालना रोड, अहिंसानगर, वेंकटेशनगर, रघुवीरनगर,

सकाळी १० ते ४ पर्यंत सिडको एन-२, एन-३, एन-४, ठाकरेनगर, पारिजातनगर, स्पंदननगर, मुकुंदवाडी, जयभवानीनगर, तिरुपती कॉलनी, एसटी कॉलनी, पुंडलिकनगर, हनुमाननगर, विश्रांतीनगर, मायानगर, गजानननगर, सावित्रीनगर, रामनगर, म्हाडा, चिकलठाणा, एसटी वर्कशॉप, बीएसएनएल ऑफिस, कन्सेप्ट फार्मा, मेल्ट्रॉन, एन-१, टॉवर सेंटर, कॅनॉट, सिडको ऑफिस, एलआयसी ऑफिस, एन-५, एन-६, एन-७, एन-९, कौसर पार्क, गणपती मंदिर, मेहता डीपी, सिसोदीया, नारेगाव, गारखेडा परिसर, पन्नालालनगर, शिवाजीनगर, 

सकाळी १० ते १२ पर्यंत कांचनवाडी, नक्षत्रवाडी, दुपारी ३ ते ४ पर्यंत देवळाई परिसरातील आभूषण पार्क, भक्त प्रल्हाद, विजयंतनगर, श्रीविहार कॉलनी, अरुणोदय कॉलनी, दत्त मंदिर, हरिराम नगर, बंबाटनगर, राजेशनगर, कौसर पार्क या भागात वीजपुरवठा बंद राहील. वीज ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

टॅग्स :electricityवीजAurangabadऔरंगाबाद