कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ आज जिल्हा बंदची हाक
By Admin | Updated: July 18, 2016 01:05 IST2016-07-18T00:49:32+5:302016-07-18T01:05:14+5:30
उस्मानाबाद : कर्जत तालुक्यातील कोपर्डी (जि़अहमदनगर) येथील अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार करून तिची अमानुष हत्या केल्याच्या निषेधार्थ

कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ आज जिल्हा बंदची हाक
उस्मानाबाद : कर्जत तालुक्यातील कोपर्डी (जि़अहमदनगर) येथील अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार करून तिची अमानुष हत्या केल्याच्या निषेधार्थ सोमवारी जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे़ याबाबत चर्चा करण्यासाठी रविवारी दुपारी उस्मानाबादेतील शासकीय विश्रामगृहात आयोजित सर्वपक्षीय, विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली़ बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी, अशा कायद्याची तरतूद करावी, असा एकत्रित सूर बैठकीत उमटला़
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील एका अल्पवयीन मुलीवर जबरी अत्याचार करून तिचा खून करण्यात आला आहे़ माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा जिल्ह्यात सर्वत्र निषेध नोंदविण्यात येत आहे़ या घटनेच्या निषेधार्थ आंदोनालची रूपरेषा ठरविण्यासाठी रविवारी दुपारी शहरातील शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते़ बैठकीत प्रारंभी मयत मुलीला श्रध्दांजली वाहण्यात आली़ नगराध्यक्ष संपत डोके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपस्थितांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवून आरोपींना तात्काळ अटक करून, कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली़ तसेच बलात्काराच्या प्रकरणात आता मृत्यूदंडाची शिक्षा होण्याची गरज आहे़ अशी तरतूद झाल्याशिवाय या घटनांना लगाम बसणार नसल्याचा सूर आवळला़ सोमवारी जिल्हा कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला़ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सकाळी ९ वाजता काळ्या फिती लावून मुकमोर्चा काढण्यात येणार आहे़ बैठकीस काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष अमोल पाटोदेकर, स्मिता शहापूरकर, भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, नितीन काळे, मराठा महासंघाचे भारत कोकाटे, धर्मवीर कदम, शिवसेनेचे प्रदीप साळुंके, राजाभाऊ घोडके, मसूद शेख, काँग्रेसचे शमीयोद्दीन मशायक, खलील सर, जावेद काझी, मधुकर तावडे, अनिल मंजुळे, डॉ़ चंद्रजित जाधव, विजयकुमार पवार, राजसिंह राजेनिंबाळकर, उमेशराजे निंबाळकर, रोहित निंबाळकर, अग्निवेश शिंदे, विक्रम पाटील, नितीन भोसले, श्रीकृष्ण भन्साळी, बाळासाहेब दंडनाईक, रोहित पडवळ, अभिजित निंबाळकर, ओंकार नायगावकर, जयराज खोचरे, सक्षणा सलगर, शिला उंबरे, नंदा पुनगुडे, मनिषा राखुंडे यांच्यासह विविध पक्ष, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते़ (प्रतिनिधी)