आज भाजीप्रसाद
By Admin | Updated: January 16, 2016 23:16 IST2016-01-16T23:12:52+5:302016-01-16T23:16:44+5:30
शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील सारंगस्वामी मठ संस्थानची वार्षिक यात्रा सुरू झाली असून रविवारी ‘भाजी प्रसाद’ आहे.

आज भाजीप्रसाद
शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील सारंगस्वामी मठ संस्थानची वार्षिक यात्रा सुरू झाली असून रविवारी ‘भाजी प्रसाद’ आहे.
यंदाही भाजी महाप्रसादाचे भव्य आयोजन असून जवळपास १०० क्विंटल भाजी गोळा केली आहे. सर्व भाज्या एकत्र करून एकाच ठिकाणी शिजविली जाते. ही भाजी खाल्ल्यास रोगराई व इतर आजार नाहीसे होतात, अशी नागरिकांची धारणी आहे. १६ जानेवारी रोजी थोरला मठ संस्थान वसमत येथून पदयात्रा शिरड शहापूर गावात दाखल झाली. तसेच हयातनगर, फुळकळस, सावळी, सोडेगाव आदी गावातील भाविक पदयात्रेने दिंडी घेऊन आले आहेत. सर्वांची भोजन व्यवस्था पंढरीअप्पा बिचेवार यांच्याकडून केली आहे. गावातून रात्री पालखी मिरवणूक निघाली. १७ जानेवारी रोजी पहाटे समाधीय रूद्राभिषेक व सकाळी ९ ते १२ वाजता कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. महाराजांचे आगमन झाले आहे. १२ वाजल्यापासून भाजी महाप्रसाद चे वाटप करण्यात येणार आहे. भाजी सोबत पोळीचे वाटप उज्वलाताई तांभाळे यांच्या वतीने करण्यात येत आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हरिभाऊ रावळे, पुंजाप्पा पारडे, शंकर आकमार, बालाजी कट्टेकर, गंगाप्रसाद आणेवार तसेच विश्वस्त कमेटी, यात्रा कमेटी व वीरशैव समाज, ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. (वार्ताहर)