आज सखीमंच सदस्यांसाठी ‘सुंदर मी होणार’ कार्यक्रम

By Admin | Updated: September 13, 2014 23:04 IST2014-09-13T22:53:40+5:302014-09-13T23:04:53+5:30

परभणी : सखीमंच सदस्यांसाठी १४ सप्टेंबर रोजी ‘सुंदर मी होणार’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे़

Today, the 'Beautiful Mega' program for Rakhine members is going on | आज सखीमंच सदस्यांसाठी ‘सुंदर मी होणार’ कार्यक्रम

आज सखीमंच सदस्यांसाठी ‘सुंदर मी होणार’ कार्यक्रम

परभणी : सखीमंच सदस्यांसाठी १४ सप्टेंबर रोजी ‘सुंदर मी होणार’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे़ विशेष म्हणजे, इंटरनॅशनल ट्रेनर वृंदा सेडन ह्या सदस्यांना विशेष मार्गदर्शन करणार आहेत़
येथील शनिवार बाजारातील हरिप्रसाद मंगल भवन येथे १४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे़ कार्यक्रमात सखींसाठी दुल्हन मेकअप स्पर्धा आयोजित केली आहे़ यात सखींनी दुल्हनच्या वेषात तयार होवून या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचे आहे़ सखीमंच सदस्यांसाठी प्रथमच हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला आहे़
कार्यक्रमात इंटरनॅशनल ट्रेनर वृंदा सेडन ह्या स्किन प्रॉब्लेम, हेअर प्रॉब्लेम, हेअर स्टाईल, मेकअप याविषयी मार्गदर्शन करणार आहेत़ या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रायोजकत्व साई बेन्टेक्स ज्वेलरीचे बालासाहेब घिके, ग्लोरी ब्युटी पार्लरच्या लता वाजपेयी, सृष्टी स्कीन केअर सेंटरच्या डॉ़ विद्या कुलदीपक यांनी स्वीकारले आहे़ याच कार्यक्रमात महालक्ष्मी डेकोरशन स्पर्धेचा निकाल घोषित करून बक्षीस वितरणही होणार आहे़ तसेच सखीमंच आयोजित गायत्री ज्वेलर्स व राज आॅप्टीकल्स यांच्या वतीने लकी ड्रॉ होणार आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Today, the 'Beautiful Mega' program for Rakhine members is going on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.