तंबाखूमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढले
By Admin | Updated: May 31, 2014 00:30 IST2014-05-30T23:48:02+5:302014-05-31T00:30:49+5:30
हिंगोली : तंबाखूचे सेवन केल्यामुळे ओरल कॅन्सर होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असले तरी तंबाखू खाणार्यांची संख्या कमी होत नसल्याने वैैद्यकीय तज्ज्ञांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
तंबाखूमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढले
हिंगोली : तंबाखूचे सेवन केल्यामुळे ओरल कॅन्सर होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असले तरी तंबाखू खाणार्यांची संख्या कमी होत नसल्याने वैैद्यकीय तज्ज्ञांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. बदलत्या समाज संस्कृतीमध्ये वावरताना धूम्रपान करणार्यांची संख्याही झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. वैैद्यकीय तज्ज्ञांच्या मते तंबाखूमुळे मृत्यू ओढवणार्यांची संख्या देशात दरवर्षी १० लाखांवर गेली आहे. तंबाखू चघळणार्या वैैशिष्ट्यपूर्ण सवयींमुळे देशात दरवर्षी दरवर्षी ३ लाख लोकांना मुख कर्करोग (ओरल कॅन्सर) होतो व त्यातील एक तृतीयांश जणांना मृत्यूला सामोरे जावे लागते. हे धक्कादायक वास्तव्य समोर आले असतानाही देशात ५५ टक्के पुरूष आणि १६ टक्के महिला तंबाखूचे सेवन करीत असल्याचे आढळून आले आहे. पुरूषांबरोबर महिलांमध्येही तंबाखू चघळण्याचे व धूम्रपान करण्याचे प्रमाण दिसून येत आहे. त्यामध्ये महिलांमधील तंबाखू संबंधित कॅन्सरचे प्रमाण २०१० मध्ये १०.१ टक्के तर २०११ मध्ये १३.१ टक्के झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईमध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात ३५ वर्ष वयावरील पुरूषांच्या तंबाखू सेवनाचे प्रमाण ६९.३ टक्के तर याच वयोगटातील महिलांचे प्रमाण ५७.७ टक्के असल्याचे आढळून आले आहे. याशिवाय किशोरवयीन मुलांमध्येही धूम्रपान करण्याचे प्रमाण दिसून येत आहे. या मागचे मुख्य कारण वातावरण, समाजातील स्वत:विषयीची असुक्षितता वाटणे, किंवा मित्राच्या दबावामुळे प्रवृत्त होणे, ही असल्याची जाणकरांचे मत आहे. (जिल्हा प्रतिनिधी) तंबाखू सेवनामुळे मुख कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: १७ ते २२ वर्षे वयोगटातील तरूणांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यामुळे आता पालकांनीच याबाबतची खबरदारी घेऊन आपल्या पाल्यास तंबाखू सेवनापासून परावृत्त करणे आवश्यक आहे. तसेच धूम्रपान करणार्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. कमी वयातील मुले धूम्रपान करीत असल्याने त्यांनाही कर्करोग होवू शकतो. त्यामुळे पालकांची जबाबदारी वाढली आहे. - डॉ.नंदकुमार करवा,वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रूग्णालय, हिंगोलीप्रत्येक सिगारेटमध्ये चार हजारपेक्षा जास्त रसायने असतात. त्यापैकी कमीत कमी ४३ रसायने कॅन्सरला कारणीभूत ठरतात. सिगारेटमध्ये निकोटीन नावाचा हानीकारक पदार्थ असतो. सिगारेटच्या व्यसनामुळे फुफ्फुसाचा कर्करोग, घशाचा कर्करोग आदी आजार होतात. धूम्रपानामुळे दरवर्षी ३५ हजार जणांचा अतिउष्णता वाढून मृत्यू झाल्याचे तर ३ हजार ७०० जणांचा फुफ्फु साचा कर्करोग होवून मृत्यू झाल्याचे सर्वेक्षणाअंती स्पष्ट झाले आहे. प्रबळ इच्छाशक्ती असेल तर धूम्रपान सोडता येऊ शकते. प्रारंभी उदास वाटणे, निराश होणे, चिडचिड होणे किंवा झोप न येणे, या समस्या येऊ शकतात; परंतु निराश होता कामा नये. धूम्रपान सोडण्यासाठी निकोटीन पेंच हे रासायनिक द्रव्य शरीरावर लावल्यास व्यसनी व्यक्तीला धूम्रपान करण्याची इच्छा होत नाही, असे यासंदर्भात काम करणार्या मदतगटांचे म्हणणे आहे. कोलंबसबरोबर गेलेल्या खलाशांनी अमेरिकेतील रेड इंडियन्सकडून तंबाखूचे कलम युरोपात आले. तेथून ते स्पेनमार्गे जगभर पसरले. प्रारंभी ही औषधी वनस्पती म्हणून वापरली गेली; परंतु १६ व्या शतकापासून तंबाखूंच्या अनिष्ट परिणामांची शंका डॉक्टरांना येऊ लागली, असा तंबाखूचा इतिहास सांगतो.