तिसगावात किराणा दुकान आगीत भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:03 IST2021-04-15T04:03:27+5:302021-04-15T04:03:27+5:30

तिसगांव ता. खुलताबाद येथील रंगनाथ आसाराम तायडे यांचे गट नं. ७६ मध्ये किराणा मालाचे दुकान आहे. रात्री दोन ...

In Tisgaon, a grocery shop caught fire | तिसगावात किराणा दुकान आगीत भस्मसात

तिसगावात किराणा दुकान आगीत भस्मसात

तिसगांव ता. खुलताबाद येथील रंगनाथ आसाराम तायडे यांचे गट नं. ७६ मध्ये किराणा मालाचे दुकान आहे. रात्री दोन वाजता दुकानाच्या शटरखालून ज्वाळा बाहेर पडत असल्याचे परिसरातील नागरिक यांच्या लक्षात आले. पण आग मोठ्या प्रमाणात आसल्याने आग विझवण्यासाठी खूप प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत पूर्ण किराणा दुकान आगीत जळून खाक झाली होती. आग खूपच भडकल्याने या आगीत दुकानातील फ्रिज, टी.व्ही. फर्निचर, तेलाचे डबे, साखरेचे पोते, गल्ल्यातील दोन ते तीन हजार रोख रक्कम व सर्व प्रकारचे किराणा सर्व जळून खाक झाले. यात तायडे यांचे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. परिसरातील नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली. अन्यथा शेजारी घरेही आगीच्या कवेत येऊन मोठे नुकसान झाले असते. असलेल्या घरांनाही झळ पोहोचली असती. यावेळी प्रशासनाच्या वतीने तलाठी सचिन भिंगारे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

फोटो कॅप्शन : तिसगांव किराणा दुकानास आग लागून झालेल्या नुकसानी पाहणी करताना तलाठी सचिन अंभाेरे.

140421\dilip misal_img-20210414-wa0084_1.jpg

तिसगांव किराणा दुकानास आग लागून झालेल्या नुकसानी पाहणी करताना तलाठी सचिन अंभाेरे.

Web Title: In Tisgaon, a grocery shop caught fire