तिरुपती विशेष रेल्वेच्या तीन फेऱ्यांमध्ये वाढ

By Admin | Updated: August 8, 2014 01:23 IST2014-08-08T01:13:39+5:302014-08-08T01:23:25+5:30

औरंगाबाद : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने औरंगाबाद-तिरुपती-औरंगाबाद साप्ताहिक विशेष रेल्वेच्या तीन फेऱ्या वाढविल्या आहेत.

Tirupati special train trips in three rounds | तिरुपती विशेष रेल्वेच्या तीन फेऱ्यांमध्ये वाढ

तिरुपती विशेष रेल्वेच्या तीन फेऱ्यांमध्ये वाढ

 


औरंगाबाद : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने औरंगाबाद-तिरुपती-औरंगाबाद साप्ताहिक विशेष रेल्वेच्या तीन फेऱ्या वाढविल्या आहेत. १५, २२ आणि २९ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजता औरंगाबाद स्थानकाहून ही रेल्वे निघेल. दुसऱ्या दिवशी दुपारी ३.३० वाजता ही रेल्वे तिरुपती येथे पोहोचेल. जालना, परभणी, नांदेड, सिकंदराबाद, विजयवाडामार्गे ही रेल्वे तिरुपती येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी १६, २३ आणि ३० आॅगस्ट रोजी सायंकाळी ५.१० वाजता तिरुपतीहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजता औरंगाबादेत पोहोचेल.
मोटारसायकल अपघातात वृद्ध ठार
औरंगाबाद : धावती मोटारसायकल घसरल्यामुळे जखमी झालेल्या इस्माईल बनेमिया अत्तार (६५, रा. ईदगाहनगर, वैैजापूर) यांचा उपचार सुरू असताना ६ आॅगस्ट रोजी रात्री ८ वाजता घाटीत मृत्यू झाला. हा अपघात २५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता वैैजापूर येथे घडला.

Web Title: Tirupati special train trips in three rounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.