तिरुपती रेल्वेच्या फेऱ्या वाढविल्या

By Admin | Updated: August 31, 2014 00:11 IST2014-08-30T23:46:46+5:302014-08-31T00:11:30+5:30

पूर्णा : प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता औरंगाबाद-तिरुपती या विशेष रेल्वेच्या दोन फेऱ्या वाढविण्याचा निर्णय दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयाने घेतला आहे़,

Tirupati has increased the number of trains | तिरुपती रेल्वेच्या फेऱ्या वाढविल्या

तिरुपती रेल्वेच्या फेऱ्या वाढविल्या

पूर्णा : प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता औरंगाबाद-तिरुपती या विशेष रेल्वेच्या दोन फेऱ्या वाढविण्याचा निर्णय दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयाने घेतला आहे़, अशी माहिती वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी दिली़
मराठवाड्यातील भाविकांना तिरुपती देवस्थानासाठी सोयीची व्यवस्था व्हावी या उद्देशाने नांदेड रेल्वे विभागामार्फत औरंगाबाद- तिरुपती (क्रमांक ०७४०५) ही विशेष गाडी औरंगाबाद रेल्वेस्थानकावरून सोडण्यात आली होती़ या विशेष रेल्वे गाडीस प्रवाशांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ त्यामुळे या गाडीच्या दोन फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत़ ही विशेष गाडी ५ व १२ सप्टेंबर रोजी औरंगाबाद रेल्वेस्थानकावरून दुपारी ३ वाजता सुटून तिरुपती येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ३़३० वाजता पोहोचणार आहे़ परतीच्या प्रवासात ६ ते १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५़१० वाजता तिरुपती रेल्वे स्थानकावरून निघून दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजता औरंगाबाद रेल्वे स्थानकावर येणार आहे़ या गाडीस एक वातानुकूलित, सहा द्वितीय श्रेणी आणि सहा जनरल डब्बे असतील़ (प्रतिनिधी)

Web Title: Tirupati has increased the number of trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.