तीर्थपुरीकरांना रॉकेल मिळेना
By Admin | Updated: September 7, 2014 00:22 IST2014-09-06T23:47:16+5:302014-09-07T00:22:46+5:30
तीर्थपुरी : येथील वार्ड क्र. ६ मधील झोपडपट्टीला गेल्या आठ महिन्यांपासून रॉकेल पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना इतर गावातून जादा दर देऊन रॉकेल आणावे लागते. त्वरित रॉकेल पुरवठा करावा,

तीर्थपुरीकरांना रॉकेल मिळेना
तीर्थपुरी : येथील वार्ड क्र. ६ मधील झोपडपट्टीला गेल्या आठ महिन्यांपासून रॉकेल पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना इतर गावातून जादा दर देऊन रॉकेल आणावे लागते. त्वरित रॉकेल पुरवठा करावा, अशी मागणी ग्रा.पं.सदस्या अनिता रमेश बोबडे यांनी केली.
वार्ड क्र. ६ मधील नागरिकांना गेली आठ महिन्यांपासून दिवाबत्तीसाठी रॉकेल वाटप नाही. येथील रॉकेल विक्रेते देवीलाल बजाज यांनी या वार्डाची रॉकेलची यादी तहसील कार्यालयाला मागितली; परंतु रॉकेल कमी येत असल्याने रॉकेल वाटपाला सध्याच्या लोकसंख्येनुसार पुरत नाही. त्यामुळे त्यांनी वाटप बंद केले आहे. तहसील कार्यालयाने यादी दिली नाही. त्यामुळे या वार्डातील लोक दिवाबत्तीला रॉकेल काळ्या बाजारातून चढ्या दराने खरेदी करीत आहेत. झोपडपट्टीमधील लोक हे मजुरी करणारे असल्याने त्यांना रॉकेलपासून वंचित राहावे लागत आहे. येथील ग्रामस्थांना तात्काळ शासन दराने रॉकेल पुरवठा करावा, अशी मागणी अनिता बोबडे यांनी केली आहे. (वार्ताहर)
घनसावंगी तालुक्यातील कोठी येथील स्वस्तधान्य दुकानदारांकडून चढ्या भावाने धान्य मिळत असल्याची तक्रार गावकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
४शिधापत्रिकेप्रमाणे धान्य मिळत नाही. शिधापत्रिका देण्यात आलेली नाही. दारिद्र्य रेषेखालील यादीत नाव आहे; परंतु धान्य मिळत नाही. योग्य भावात धान्य दिले जात नाही.
४बीपीएलमध्ये नावे आहेत; परंतू स्वतधान्य वाटप यादीत नावे नाहीत, धान्य दिल्यावर पावती मिळत नाही, रॉकेल सुध्दा दिले जात नसून या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.