‘नरेगा’ची दीड कोटींची देयके थकीत

By Admin | Updated: August 24, 2014 00:37 IST2014-08-24T00:37:41+5:302014-08-24T00:37:41+5:30

कंधार: तालुक्यातील नरेगांतर्गत सिंचन विहिरी, पाणंदरस्ते, रोपवाटिका आदींची कामे २०१२-२०१३ मध्ये करण्यात आली.

Tired of the payment of one and a half crore of 'NREGA' | ‘नरेगा’ची दीड कोटींची देयके थकीत

‘नरेगा’ची दीड कोटींची देयके थकीत

कंधार: तालुक्यातील नरेगांतर्गत सिंचन विहिरी, पाणंदरस्ते, रोपवाटिका आदींची कामे २०१२-२०१३ मध्ये करण्यात आली. परंतु कुशलची १ कोटी ५४ लाख ८० हजार २६ रुपयाची देयके प्रलंबित आहेत. आॅगस्ट अखेरपर्यंत ६१ गावात पथकाकडून तांत्रिक तपासणी केल्यानंतर देयके मिळतील, अशी बाब समोर आली आहे.
तालुक्यातील नरेगा कामाची सतत वरिष्ठ पातळीवरुन वाखाणणी करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात नरेगाची कामे करण्यात कंधार तालुक्याने आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. सुरुवातीला नरेगांतर्गत असलेल्या कामाची संख्या सतत वाढत गेली. त्यामुळे सिंचन, रस्ते आदी कामाने गावपातळीवर लक्ष वेधून घेतले आणि कामाचा सपाटा वाढला. काही कामामुळे तक्रारीचा सूर वाढला. त्यामुळे कामाला जशी मरगळ आली. तशीच देयके काढण्याला गतीरोध निर्माण झाला. त्यात चांगली कामे होवूनही कुशलच्या देयकांचा प्रश्न लोंकळला. काही कामात काही त्रुटी असल्याची तरी दर्जा समाधानकारक नसला तरीही सुधारण्याला वाव असतो.
कुशल कामाचे देयके मिळविण्यासाठी गत काही महिन्यात तगादा लावण्यात आला . ग्राम पंचायत व संबंधित यंत्रणेने देयके मिळविण्याचा प्रयत्न केला. तरीही हाती काही लागत नव्हते, जिल्हाधिारी यांनी तांत्रिक तपासणीसाठी पथक गठीत केले आहे. पथक आता आंबुलगा, औराळ, बाभूळगाव, बामणी (प.क.), बारुळ, भोजूची वाडी, बोळका, बोरी (खु), चिखलभोसी, दैठणा, चिखली, दाताळा, गुंडा, देवयाचीवाडी, धानोर-कौठा, दही कळंबा, गांधीनगर, गुलाबवाडी, हाडोळी, गोगदरी, हाळदा, हिप्परगा (शहा), जाकापूर, कौठा, जंगमवाडी, कंधारेवाडी, कारतळा, कळका, खुड्याचीवाडी, कुरुळा, लाठ (खु), महालिंगी, मानसिंगवाडी, मरशिवणी, नागलगाव, मसलगा, नंदनवन, नारनाळी, पोखर्णी, नावंद्याचीवाडी, नवघरवाडी, पानभोसी, नवरंगपूरा, फुलवळ, पांगरा, पानशेवडी, पेठवडज, रामानाईकतांडा, राऊतखेडा, संगमवाडी, सावळेश्वर, शेल्लाळी, शिराढोण, शिरसी (खु), शिरुर, तळ्याचीवाडी, उमरज, उस्माननगर आदी ६१ गावात तांत्रिक तपासणी करील. प्रलंबित देयकाने अनेकांची मोठी घालमेल होत होती. जवळपास दीड वर्षापासून मोठी प्रतिक्षा करावी लागली. या महिना अखेर तांत्रिक तपासणीचे काम पूर्ण होईल आणि तपासणीत तांत्रिकता सिद्ध झाल्यानंतर देयके मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. (वार्ताहर)

Web Title: Tired of the payment of one and a half crore of 'NREGA'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.