‘आम्ही खवय्ये’तून सखींना टिप्स
By Admin | Updated: June 1, 2014 00:30 IST2014-06-01T00:10:20+5:302014-06-01T00:30:20+5:30
बीड:‘लोकमत’ सखी मंच व किडझी च्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी आयोजित ‘आम्ही खवय्ये’ या कार्यक्रमातून सखींना प्रसिद्ध शेफ समीर दामले यांनी अडीच तास प्रशिक्षण दिले़

‘आम्ही खवय्ये’तून सखींना टिप्स
बीड:‘लोकमत’ सखी मंच व किडझी च्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी आयोजित केलेल्या ‘आम्ही खवय्ये’ या रसदार कार्यक्रमातून उपस्थित सखींना प्रसिद्ध शेफ समीर दामले यांनी वेगवेगळ्या टिप्स देऊन अडीच तास प्रशिक्षण दिले़ यावेळी प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली़ येथील यशवंतराव चव्हाण नाट्यमंदिरात झालेल्या या कार्यक्रमासाठी सभागृह खचाखच भरले होते़ दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली़ डॉ़ उज्वला वनवे यांनी आपल्या बहारदार संचालनात एका बाजूला शेफ समीर दामले हे पदार्थ तयार करीत असतानाच हा पदार्थ आहारशास्त्राच्या दृष्टीने शरीरासाठी किती पोषक आहे? याची माहिती दिली़ या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्ध शेफ समीर दामले प्रात्यक्षिके दाखवून खास टिप्स दिल्या़ अडीच तासात त्यांनी शंभराहून अधिक रेसिपीची माहिती दिली़ मटरफ्राय, पनीर, मेथीमसाला, व्हेजमेन्चूरीयन, सूपचे विविध प्रकार बनविण्यात आले़ यावेळी सखींमधून प्रतिभा तांबट यांनी दाळबाटीची रेसिपी सांगितली़ दररोज कुठला वेगळा पदार्थ बनवावा किंवा पारंपरिक पदार्थात काय नवीन बदल करावा? आदी प्रश्न सखींनी विचारले़ त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दामले यांनी दिली़ यावेळी लज्जतदार पदार्थांची गोडी जिभेवर दरवळीत सखींनी निरोप घेतला़ ‘किडझी इंग्लिश स्कूल’च्या प्राचार्या शीतल गणेश मैड यांची प्रमुख उपस्थिती होती़ शाळेतील महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)