करंजखेड : छत्रपती संभाजीनगर येथून आई-वडिलांना भेटण्यासाठी करंजखेड येथे दुचाकीवर येताना फुलंब्री ते निधोना रस्त्यावर आडगाव बुद्रुक गावाजवळ अज्ञात पिकअप वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात भावाचा मृत्यू झाल्यानंतर गंभीर जखमी बहिणीचाही छत्रपती संभाजीनगर येथील घाटीत उपचारादरम्यान शनिवारी मध्यरात्री मृत्यू झाला. अपघाताची ही घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली होती.
कन्नड तालुक्यातील करंजखेड येथील गणेश संजय सुरडकर (वय ३०) व त्याची बहीण निशा संजय सुरडकर (२५) हे छत्रपती संभाजीनगर येथे खासगी नोकरीसाठी राहत होते. आई, वडिलांना भेटण्यासाठी ते शनिवारी सायंकाळी छत्रपती संभाजीनगर येथून करंजखेड येथे दुचाकीने जात होते. फुलंब्री ते निधोना रस्त्यावर आडगाव बुद्रुक गावाजवळ रात्री ८:३० वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला अज्ञात पिकअपने जोराची धडक दिली. या अपघातानंतर बहीण, भावाला खासगी रुग्णवाहिकेद्वारे छत्रपती संभाजीनगरातील घाटीत दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून गणेश सुरडकर यांना तपासून मृत घोषित केले.
निशा यांच्यावर उपचार सुरू होते. मध्यरात्री निशाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. उत्तरीय तपासणी करून रविवारी सकाळी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर दुपारी दोन वाजता शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील व दोन बहिणी असा परिवार आहे.
Web Summary : A brother and sister died in an accident near Adgaon Budruk while traveling to visit their parents in Karanjkhed from Chhatrapati Sambhajinagar. Their motorcycle was hit by an unknown pickup vehicle. The brother died at the scene, and the sister succumbed to her injuries later at a hospital.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर से अपने माता-पिता से मिलने करंजखेड जा रहे भाई-बहन की आडगाँव बुद्रुक के पास एक दुर्घटना में मौत हो गई। उनकी मोटरसाइकिल को एक अज्ञात पिकअप वाहन ने टक्कर मार दी। भाई की मौके पर ही मौत हो गई, जबकि बहन ने बाद में अस्पताल में दम तोड़ दिया।