ग्रामरोजगार सेवकांवर उपासमारीची वेळ
By Admin | Updated: July 23, 2014 00:34 IST2014-07-22T23:48:48+5:302014-07-23T00:34:15+5:30
मानदेऊळगाव : बदनापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कार्यालयाकडून मिळणारे मानधन गत वर्षभरापासून रखडल्याने ग्रामरोजगार सेवकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

ग्रामरोजगार सेवकांवर उपासमारीची वेळ
मानदेऊळगाव : बदनापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कार्यालयाकडून मिळणारे मानधन गत वर्षभरापासून रखडल्याने ग्रामरोजगार सेवकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील विविध कामाचे पैसे रखडलेले आहेत. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांना हे पैसे वेळेवर वाटप झालेले आहेत. परंतु बदनापूर पंचायत समितीकडूनच टाळाटाळ का होत आहे, असा प्रश्न ग्रामरोजगारांतून उपस्थित केला जात आहे. गत वर्षभरापासून ग्रामरोजगारासाठी टेबल, खुर्च्या, कपाटासाठी धनादेश मिळालेले नाहीत. या साहित्यासाठीच्या खर्चाची तात्काळ तरतूद करावी, अशी मागणी संदीप जाधव, किशोर गायकवाड, नवगिरे, संतोष हिवाळे, मच्ंिछद्र खरात, गायकवाड, घोरपडे, वाळके, कोल्हे, डोळसे, रेगुडे, घुगे, डिघे, चव्हाण, बोर्डे आदींनी केली आहे.
घेराओ घालणार
ग्रामरोजगार सेवकांच्या विविध मागण्यांसाठी नागपूर येथे ५ व ६ आॅगस्ट रोजी नागपूर आयुक्त कार्यालयाला घेराओ घालणार असल्याचे ग्रामरोजगारांनी म्हटले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व रोहयोमंत्री नितीन राऊत यांच्या घरासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.ग्रामरोजगारसेवकांनी ४ आॅगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता जालना रेल्वेस्थानकावर उपस्थित रहावे, असे आवाहन किशोर जाधव, संतोष हिवाळे, देवीदास चव्हाण, गणेश कोल्हे, चव्हाण, उढाण, काळे, किशोर गायकवाड, सुनील डोळसे, भरत फलके आदींनी दिला आहे.